Goa Government Job Scam Dainik Gomantak
गोवा

एकाच दिवसात 'Cash For Job' ची आणखीन दोन प्रकरणे उघडकीस; दीपश्री विरोधात तक्रार करणारच निघाला आरोपी

Goa Government Job Scam: कॅश फॉर जॉबची आणखीन दोन प्रकरणे उघडकीस, गोवा पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून दुसऱ्या प्रकरणाचा शोध सुरु आहे.

Akshata Chhatre

गोवा: सध्या गोव्यात कॅश फॉर जॉब स्कॅमची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत. यात अनेक मंत्री तसेच नेत्यांची नावे देखील घेतली जात आहेत. गोव्यातून दिवसेंदिवस उघड होणाऱ्या या प्रकरणांमध्ये प्रिया यादव, दीपश्री सावंत तसेच पूजा नाईक या तीन महिलांचा प्रमुख समावेश आहे.

या तिन्ही महिलांनी ठिकठिकाणी सामान्य लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. सोमवारी (११ नोव्हेंबर) रोजी मिळालेल्या माहितीनुसार कॅश फॉर जॉबची आणखीन दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि गोवा पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून दुसऱ्या प्रकरणाचा शोध सुरु आहे.

घडलेल्या दोन्ही प्रकारांमधल्या पहिल्या प्रकरणात संदीप जग्गनाथ परब याने सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने ५ लाख घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांकडून त्याला अटक केल्याची बातमी समोर आली आहे .

यापूर्वी संदीप परबने आरोपी दीपश्री सावंतच्या विरोधात सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिस तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन दीपश्री सावंत हिच्या विरोधात गौप्यस्फोट देखील केला होता.

तर दुसरे प्रकरण फोंडा येथून उघड झाले असून एका विद्यालयातील शिक्षकाने शिक्षण खात्यात एलडीसी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ४० लाखांहून अधिक रक्कमेचा गंडा घातला असल्याची बातमी उघड झाली आहे. या शिक्षका विरोधात फोंडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस एकूण घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT