Jodhpur, Rajasthan dainik gomantak
गोवा

गोव्यात चांदीचा व्यवसाय करून करोडपती व्हायचे स्वप्न; नववीचे दोन विद्यार्थी शाळेतून पळाले, जोधपूरची रंजक घटना

ऑनलाइन व्हिडिओ पाहून श्रीमंत होण्यासाठी दोन अल्पवयीन विद्यार्थी घरातून पळून गेले. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी सर्व नियोजनही केले होते.

Pramod Yadav

आजकाल सर्वत्र सोशल मिडियाचा धुमाकूळ माजला आहे. ऑनलाइन गुरू आणि विविध व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. जलद पैसा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काहीजण चुकीच्या गोष्टी करतात.

असेच, ऑनलाइन व्हिडिओ पाहून श्रीमंत होण्यासाठी दोन अल्पवयीन विद्यार्थी घरातून पळून गेले. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी नियोजनही केले. फक्त एक चूक झाली आणि दोघे पकडले गेले. समुपदेशन झाले तेव्हा समोर आलेली माहिती ऐकून अधिकारी देखील अवाक् झाले.

घटना आहे जोधपूर शहरातील एका लोकप्रिय शाळेतील, या शाळेतील इयत्ता नववीचे दोन विद्यार्थी सहा मे रोजी बेपत्ता झाले होते. मुलांच्या पालकांना घरी एक चिठ्ठी सापडल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी शाळेपासून ते आजूबाजूच्या बाजारपेठांपर्यंत सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, मुले जैसलमेरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास जैसलमेर येथील या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांसह पोलिस अधिकाऱ्यांनी जोधपूरला नेले.

मुलांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पोलिसांना खरी कहाणी सांगितली. झाले असे की दोघेही ओह माय गॉड हा व्यवसायाशी संबंधित शो अनेक दिवस पाहत होते. यात दिसणारी सर्व पात्रे काल्पनिक आहेत. या शोमध्ये जेव्हा दोन्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उद्योगपतींची कहाणी पाहिली तेव्हा त्यांनीही प्रसिद्ध आणि श्रीमंत व्हायची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर दोघेही पळून गेले.

श्रीमंत कसे व्हायचे यासाठी दोघांनी प्लॅन ठरवला आणि त्यानंतर ते शाळेतून गेले.

गोव्यात करायचा होता चांदीचा व्यवसाय

पोलीस अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले तेव्हा, दोघांचा गोव्यात चांदीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करायचा होता. अशी माहिती समोर आली. सुरूवातीला चांदीचा व्यवसाय आणि त्यानंतर ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्याचा त्यांचा प्लॅन होता.

घरातून कपड्यांपासून पैशांपर्यंत सर्व व्यवस्था त्यांनी केली होती. एका विद्यार्थ्याने तर घरातून 90 हजार रुपयांची रक्कम आणली होती. या पिगी बँकेत त्याने घरातून बाहेर पडताना एक पत्रही टाकले होते, जे नंतर पालकांना सापडले.

मुलांनी बिकानेरहून गोव्याला जायचा बेत आखला होता. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी तीन विविध शहरांची तिकिटे खरेदी केली होती. दुपारी ते जोधपूर स्टेशनवर पोहोचले तेव्हा नागपूरला जाणारी ट्रेन, मुंबईला जाणारी रणकपूर एक्स्प्रेस आणि जैसलमेरला जाणारी ट्रेन होती.

दोघांनी मुंबई, नागपूर आणि जैसलमेरची तीन तिकिटे खरेदी केली. दोघेही आधी रणकपूर एक्स्प्रेसमध्ये चढले, मात्र या ट्रेनमधून उतरल्यानंतर ते थेट जैसलमेर ट्रेनमध्ये गेले.

पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिले असता दोघेही रणकपूर एक्स्प्रेसमध्ये बसलेले दिसले. यावर अबू रोड जीआरपीला सतर्क करण्यात आले. स्टेशनवर रेकॉर्ड शोधला असता त्याने नागपूरचीही दोन तिकिटे घेतल्याचे आढळून आले. यावर जयपूरमध्ये जीआरपीलाही सतर्क करण्यात आले. या गाड्यांचा शोध घेऊनही ही मुले सापडली नाहीत, तेव्हा पालकांची चिंता वाढली.

दोन्ही मुले रात्री जैसलमेरला पोहोचली होती. दोघेही रूम घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले होते, मात्र दोघांकडे ओळखपत्र नसल्याने आणि अल्पवयीन असल्याने हॉटेलधारकाने खोली देण्यास नकार दिला.

यादरम्यान एका विद्यार्थ्याचा मोबाईल डेटा संपला होता. यावर त्याने हॉटेलवाल्याकडून वाय-फाय मागितले, मात्र त्यानेही रिचार्ज न केल्याचे कारण देत इंटरनेट देण्यास नकार दिला.

यानंतर विद्यार्थ्याने हॉटेल मालकाचा नंबर त्याच्या मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवला आणि तिला नंबर रिचार्ज करण्यास सांगितले. मात्र, तो कुठे आहे हे त्याने त्याच्या मित्रालाही सांगितले नाही.

यावर त्याच्या मित्राने त्याच्या पालकांशी संपर्क साधून सांगितले की, त्याला एका नंबरवर रिचार्ज करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला असता तो जैसलमेरचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने जोधपूर स्थानकाचे फुटेज पुन्हा तपासले आणि तिकीटांचा इतिहास तपासला तेव्हा असे दिसून आले की दोघांनीही जैसलमेरची तिकिटे घेतली आहेत.

जैसलमेर जीआरपी हॉटेलमध्ये पोहोचले, पण नंतर दोघेही तिथून निघून गेले. पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला तेव्हा दोघेही जैसलमेर रेल्वे स्थानकाजवळ सापडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT