ICHR In Goa: गोव्यात होणार आणखी एक संस्था, 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर मिळाली जमीन

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) गोवा आणि दिब्रुगडमध्ये दोन प्रादेशिक केंद्रे स्थापन करणार आहे.
ICHR In Goa
ICHR In GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ICHR In Goa: गोव्यात डिसेंबर 2022 मध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्धाटन करण्यात आले. त्यानंतर आता गोव्यात अजून एक संस्था येणार आहे.

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR) गोवा आणि दिब्रुगडमध्ये दोन प्रादेशिक केंद्रे स्थापन करणार आहे.

दोन्ही केंद्रासाठी परिषदेला 99 वर्षांच्या भाडेतत्वावर जमीन मिळाली आहे. परिषदेचे सचिव उमेश अशोक कदम यांनी ही माहिती दिली. 'दिप्रिंट'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद दोन प्रादेशिक केंद्रे स्थापन करणार आहे. यातील एक केंद्र गोव्यात तर दुसरे केंद्र दिब्रुगडमध्ये असेल. या प्रस्तावित केंद्रांसाठी प्रत्येकी तीन एकर जमीन 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळाली आहे. अशी माहिती कदम यांनी 'पीटीआय'ला दिली आहे.

परिषदेला दिब्रुगढ विद्यापीठात त्याच्या ईशान्य प्रादेशिक केंद्रासाठी तीन एकर जमीन मिळाली आहे. यासाठी 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ICHR In Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल स्वस्त, 16 राज्यांत शंभरीपार; जाणून घ्या राज्यातील इंधनाचे दर

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद झाली पेपरलेस

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद देशातील पहिली संपूर्णपणे डिजिटल किंवा पेपरलेस करणारी देशातील पहिली संशोधन परिषद ठरली आहे.

तसेच, परिषदेने सोमवारपासून दिव्यांग व्यक्तींना (पीडब्ल्यूडी) प्रवेशयोग्य वेबसाइट सुरू केली आहे. परिषदेने अपंग व्यक्तींसाठी दोन विशेष फेलोशिप देखील सुरू केल्या आहेत.

परिषदेने 'भारताचा सर्वसमावेशक इतिहास' या विषयावर लेखनाचे काम सुरू केले असून त्याचा पहिला खंड यावर्षी 15 ऑगस्टपर्यंत तयार होईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती उमेश अशोक कदम यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Maritime Security India
Goa Affordable Housing Project Parcem
Enemy Property Case Goa
Goa Rakshan Yatra 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com