Goa: बाणावली समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार Dainik Gomantak
गोवा

Goa: बाणावली समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांबरोबर बाणावली येथील समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुली फिरायला आल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

मडगाव: रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांबरोबर बाणावली (Benaulim beach) येथील समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुली फिरायला आल्या होत्या. दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर काही मुलं आले असून त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवून बलात्कार करण्याची घटना गोव्यात घडली. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. (Two minor girls raped on Benaulim beach in Goa)

ही घटना रविवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार 10 मित्र मैत्रिणीचा गट रात्रीच्या वेळी बाणावली किनाऱ्यावर फिरायला आला होता. त्यापैकी 5 जण पहाटेपर्यंत तिथे राहिले होते. पहाटे 3 च्या सुमारास ते परत घरी जाण्यास निघाले होते. त्यावेळी हे 4 संशयित आपल्या गाडीत दारू पित बसले होते. त्यांनी या 5 मुलांना पहिल्यावर आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांना अडविले. त्यांच्या बरोबर असलेल्या अन्य तीन मुलांना मारहाण करून त्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला.

नंतर तुमच्यावर केलेल्या आगळीकीचे आम्ही चित्रीकरण केले आहे. ते व्हायरल करायचे नसल्यास 40 हजार रुपये द्या असा धमकीचा फोन आरोपींनी मुलींना केला. असा फोन आल्यावर त्या मुलींनी प्रकरणी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत तातडीने कोलवा पोलिसांनी काल रात्री उशिरा या 4 संशयिताना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT