गोवा

Calangute: पर्यटकाच्या अपहरण प्रकरणी दोघांना अटक, पर्यटकाची सुटका

कळंगुट पोलिसांनी काही तासांतच लावला प्रकरणाचा छडा

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटकांना मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, हणजूणपर्यंत त्यांचा पाठलाग करून एका पर्यटकाचे अपहरण करण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास बागा-कळंगुट परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी आता दोन आरोपींना अटक केली आहे.

इम्रान कुरेशी आणि मार्शल कार्दोज (रा. मुड्डावाडो कळंगुट) असे अटक संशयित आरोपींची नावे आहेत. कळंगुट पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला, व अपहरण झालेल्या तामिळनाडू येथील पर्यटकाची सुटका केली आहे.

काय आहे प्रकरण?

बागा येथे अज्ञात आरोपींनी दोन पर्यटकांना आज पहाटेच्या सुमारास धमकी देत गंभीर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या पर्यटकांचा हणजूणपर्यंत पाठलाग करून एका पर्यटकाचे अपहरण केले. दरम्यान, त्याच्या साथीदाराने कळंगुट पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा मार्गस्थ करत प्रकरणाचा छडा लावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT