Agonda  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : कासव संवर्धन केंद्रावरून दोन गट आमनेसामने

Agonda News : वनाधिकाऱ्यांकडून आगोंद येथील केंद्राची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News : आगोंद येथील कासव संवर्धन केंद्र स्थलांतरित करण्याच्या मागणीवरून वन अधिकाऱ्यांसमोरच दोन गट भिडले. यावेळी दोन्ही गटात बरीच बाचाबाची झाली. मात्र प्रकरण हातघाईवर येण्यापूर्वी जैव विविधता व्यवस्थापन समिती सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आगोंद येथील कासव संवर्धन केंद्र स्थलांतरित करण्याच्या आगोंद पंचायत व आगोंद पेरीशतर्फे सादर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन वन अधिकारी राजेश नाईक यांनी प्रकल्प अधिकारी नैस्टर फर्नांडिस व वनरक्षकांसमवेत बुधवारी या केंद्राचे निरिक्षण केले. यावेळी हा प्रकार घडला.

यावेळी सरपंच प्रिटल‌ फर्नांडिस, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाबा गावकर, सदस्य नारायण देसाई, संजील नाईक गांवकर, प्रकाश फळदेसाई, उपसरपंच कैनिशा फर्नांडिस, पंच रामनाथ वेळीप, जोन फर्नांडिस, करुणा फळदेसाई,

फातिमा रॉड्रिग्ज, नीलेश पागी, तक्रारदार आगोंद पेरीशचे खजिनदार फ्रैंकी फर्नांडिस, मुख्यत्यार ब्राजो फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस, रूपा पागी, टिपू पागी, ईस्तैव फर्नांडिस, किशोर फळदेसाई, स्टीवी रॉड्रिक्स व अन्य उपस्थित होते.

कासव संवर्धन केंद्र हे हंगामी स्वरूपाचे असल्याने संरक्षित किनाऱ्यावर ते कुठेही उभारले जाऊ शकते. याबाबत तज्ज्ञ व वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असे वन अधिकारी राजेश नाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी पंच आग्नेलो फर्नांडिस समर्थक व माजी पंच टिपू पागी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली.

जागा बदलू नये : पागी

मोरजी, गाल्जिबाग व आगोंद अशी एकूण ३ ठिकाणी ओलिव्ह रिडले कासवांसाठी हंगामी संवर्धन केंद्र १९९८ साली उभारली जातात. आगोंद किनाऱ्यावर आतापर्यंत ५ वेळा जागा बदलण्यात आली आहे. सध्या असलेल्या संवर्धन केंद्राची जागा लगेच बदलण्याची गरज नाही, असे माजी पंच टिपू पागी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रासाठी जागा अयोग्य : फर्नांडिस

हे केंद्र कुणालाही विश्वासात न घेता उभारले असून ते एका खासगी शाळेजवळ आहे, त्यामुळे रिडले कासवांची संख्या घटेल. ही जागा कासव संवर्धन केंद्रासाठी योग्य नाही. हे केंद्र अन्यत्र हलवावे, असे सरपंच प्रिटल‌ फर्नांडिस,आगोंद पेरीशचे फ्रेंकी फर्नांडिस, ब्राजो फर्नांडिस यांनी सांगितले.

अहवाल वरिष्ठांना सादर करणार : नाईक

आगोंद समुद्र किनाऱ्यावर चार महिन्यांपूर्वी उभारलेले कासव संवर्धन केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी करणारे निवेदन आगोंद पेरीश व आगोंद पंचायतीतर्फे वन खात्याला सादर केले होते.

त्याची दखल घेऊन आपण या परिसराचे निरिक्षण केले. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, असे वन अधिकारी राजेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

LSG vs DC: स्टब्सची फटकेबाजी अन् प्रिन्सची खुन्नस! लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात हायहोल्टेज ड्रामा; 'हॉट टॉक'ने वेधलं लक्ष VIDEO

VIDEO: कोटींच्या फायटर जेटला लाखांच्या ड्रोननं छळलं! 'इराणी शाहेद'नं अमेरिकेच्या बाहुबली F-15 ला चारली धूळ; 'टार्गेट हिट'चा थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa Crime: दुप्पट पैशांचे आमिष अंगलट आले, 16 वर्षीय तरुणाची फसवणूक; अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

164 वर्षांपूर्वीचे घनदाट जंगल, काकोड्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान; श्री संस्थान मारुतीगडावरील हनुमान मंदिर

SCROLL FOR NEXT