लोबोंच्या तक्रारीनंतर दोघांना अटकपूर्व जामीन; ग्लेन, डेरिक यांना न्यायालयाचा दिलासा

Glen Fernandes Anticipatory Bail: कळंगुट पोलिस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, २२१, ३५१(३) सह कलम ३(५) अंतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
Glen Fernandes Anticipatory Bail
Glen Fernandes Anticipatory BailDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक काँग्रेस नेते ग्लेन फर्नांडिस आणि सामाजिक कार्यकर्ते डेरिक गोन्साल्वीस यांना म्हापसा येथील सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

कळंगुट पोलिस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, २२१, ३५१(३) सह कलम ३(५) अंतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. कांदोळी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकृत कामात अडथळा आणणे, तसेच कंत्राटदार आणि कामगारांना धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Glen Fernandes Anticipatory Bail
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

या प्रकरणाच्या तपासासाठी तपास अधिकारी पीएसआय विश्वजीत ढवळीकर यांनी दोन्ही संशयितांना २५ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यापूर्वीच २५ सप्टेंबर रोजी दोन्ही संशयितांनी आपल्या वकिलांमार्फत

म्हापसा सत्र न्यायालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ४८२ अंतर्गत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Glen Fernandes Anticipatory Bail
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com