Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

King Cobra Stunt Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली.
King Cobra Stunt Viral Video
Viral Stunt VideoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

King Cobra Stunt Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली. इंडोनेशियातील प्रसिद्ध रेप्टाइल एक्सपर्ट रिम्बा पेटुआलांग याचा पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक स्टंट व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रिम्बा एका महाकाय आणि अत्यंत विषारी किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. त्याचा हा जीवघेणा लाईव्ह शो पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी तोबा गर्दी केली.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रिम्बा मृत्यूशी खेळताना स्पष्टपणे पाहायला मिळतो. या स्टंटचा सर्वात थरारक आणि भीतीदायक भाग म्हणजे, रिम्बा त्या किंग कोब्राच्या अगदी जवळ जातो आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करतो. या महाविषारी सापाला आपल्या चेहऱ्याच्या अगदी वर फणा काढून उभे करत त्याने अत्यंत जीवघेणा खेळ केला. यादरम्यान सापाकडून छोटीशीही चूक झाली असती तर रिम्बाचा जागीच मृत्यू झाला असता. हा थरार पाहताना प्रेक्षकांचाही श्वास रोखला गेला.

King Cobra Stunt Viral Video
Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

दुसरीकडे, इंटरनेटवर हा व्हिडिओ येताच तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, अरे भाई, हा माणूस जिवंत आहे की गेला? तर दुसऱ्या एका युजरने देवाचा धावा करत लिहिले की, काय बहादुरी आहे बुवा! आम्ही असा थरार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. तर काही युजरने मजेशीर कमेंट केली की, आजकाल किंग कोब्रा सुद्धा फारसा सिरियस राहिलेला नाही. या अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com