Malbhat Dainik Gomantak
गोवा

मालभाट मशिदीसमोर दोन गटात 'फ्री स्टाईल' हाणामारी

मालभाट येथील मस्जिदमध्ये दोन गटात अगदी फ्री स्टाईल मारामारी झाली आहे. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी (Margao Police) तिघांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मालभाट येथील मशिदीमध्ये दोन गटात अगदी फ्री स्टाईल पध्दतीने मारामारी झाली आहे. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारचा नमाज पढण्यासाठी आले असताना दोन गटात हा वाद झाला. यात अस्लम शेख आणि अन्य एकाला दुसऱ्या गटाकडून मारहाण करण्यात आली. (Two groups clashed at a mosque in Malbhat)

दरम्यान, या दोन युवकांना हत्यारे घेऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न करण्यात आला असा आरोप भाजपचे प्रवक्ते उर्फ़ान मुल्ला यांनी केला असून या हल्ल्याला राजकीय वैमनस्याची किनार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संध्याकाळच्या नमाजावेळी काही युवक नमाज पठणासाठी या मशिदीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची मस्जिदीत झाली होती त्यानंतर मशिदीबाहेर अस्लम शेख आणि मैनु शेख यांच्यावर विरोधी गटाच्या सदस्यांनी लोखंडी सळी आणि दंडुक्याने हल्ला केला असा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, या मारहाणीहबद्दल बोलताना अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी सांगितले की, या गटाची मशिदीचे सचिव यांना मारहाण करण्याची योजना होती. या विषयी त्यांना मारण्याचे का नियोजन करण्यात आले होते असे असे विचारले त्यांनी माझयावर हल्ला करण्याचा कट आगोदरपासूनच रचण्यात आला होता. हा गट गोव्यातील नसून ते बिगर गोमंतकीय मुस्लिम असल्याचा दावा अस्लम शेख यांनी केला आहे. या विषयावर बोलताना भाजप प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी बोलताना सांगितले की, अस्लमवर झालेला हल्ला राजकीय प्रेरीत आहे. गेल्या विधासभेच्या निवडणुकीत अस्लम शेख यांनी बाबू आजगावकर यांच्यासाठी काम केले होते, त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुल्ला यांनी यावेळी केली आहे. तसेच मडगाव नागरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा निंदनीय प्रकार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT