Accident
Accident  Dainik Gomantak
गोवा

ISL : केरळ ब्लास्टर्सच्या दोन चाहत्यांचा अपघातात मृत्यू

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

पणजी/कासरगोड (केरळ) : इंडियन सुपर लीगची (ISL) अंतिम चरनात आला असून यातील अंतिम सामना हा गोव्यात खेळला जाणार आहे. तर फुटबॉलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचल्याने अनेकांनी आधीच फायनलची तिकटं बुक केली आहेत. तर अनेक चाहते अंतिम सामना पाहण्यासाठी हजारो चाहते गोव्याकडे येत आहेत. हा सामना केरळ ब्लास्टर्स विरूद्ध हैदराबाद एफसी यांच्यात होणार आहे. मात्र सामन्याच्या आधी केरळ ब्लास्टर्ससाठी दुखद बातमी येऊन थडकली असून त्यांच्या दोन चाहत्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जमशीर आणि मोहम्मद शबीर असे अपघातात निधन झालेल्या चाहत्यांची नावे आहेत. हा अपघात केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील उडुमा येथे हा झाला. (Two fans of Kerala Blasters died in an road accident)

जमशीर (वय 22) आणि मोहम्मद शबीर (वय 21) हे केरळ ब्लास्टर्स विरूद्ध हैदराबाद एफसी (hyderabad FC) यांच्यात होणार अंतिम सामना पाहण्यासाठी गोव्याला (Goa) दुचाकीवरून निघाले होते. कासरगोड जिल्ह्यातील उडुमा येथे एका मिनी लॉरीने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मलप्पुरम ही केरळमधील फुटबॉलची राजधानी म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये असंख्य फुटबॉल (Football) स्पर्धा होतात. तर मलप्पुरममधील सहल अब्दुल समद आणि त्रिशूर येथील के.पी. राहुल यांची संघातील उपस्थितीने मलप्पुरम जिल्ह्यातील आणि राज्याच्या इतर भागांतील चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान मलप्पुरम जिल्ह्यातील चाहते सात लक्झरी बसमधून गोव्यात पोहोचले आहेत. तर फातोर्डा (Fatorda) येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आसन क्षमता 13000 हजार असताना 14000 तिकिटांची विक्री झाली आहे. केरळ ब्लास्टर्स (Kerala Blasters) संघाच्या चाहत्यांनी सर्वाधिक तिकिटे खरेदी केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT