gold Smuggling  Dainik Gomantak
गोवा

दाबोळी’तील दोन कोटींचा ऐवज जप्त

महसूल गुप्तचर विभागाची कारवाई: ड्रोन, सोने आणि अमली पदार्थ हस्तगत

दैनिक गोमन्तक

वास्को: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागातील गुप्तचरांनी दाबोळी विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून सुमारे 2.13 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केला. यासंदर्भात डीआरआयच्या गुप्तचरांनी पाच प्रवाशांना अटक केली असून त्यांच्याकडून कॉम्बो ड्रोन, सोने, अमेरिकन तंबाखू असलेले पाकीट आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. त्याची किंमत सुमारे 2.13 कोटी रुपये आहे.

या प्रकरणातील पाचजण दुबईहून आले असून त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवार, 19 रोजी पहाटे विदेशातून येणाऱ्या विमानातून भारतात प्रतिबंधित असलेल्या उच्च दर्जाच्या कॉम्बो ड्रोनची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांकडून डीआरआयच्या गोवा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयच्या पथकाने मंगळवारी पहाटे दाबोळी विमानतळावर सापळा रचला. पहाटे शारजाहून आलेले ‘एअर अरेबिया जी-9492’ हे विमान उतरले. यावेळी डीआरआयच्या पथकाने प्रवासी तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी केली. त्यांच्याकडे 6 कार्ड बोर्ड बॉक्स आणि 5 ट्रॉली बॅग आढळून आल्या.

फक्त 30 ग्रॅम तंबाखूची किंमत 1,199 रुपये

संशयितांच्या साहित्याची झडती घेतली असता, 49.08 लाख रुपये किमतीचे 38 प्रतिबंधित उच्च दर्जाचे कॉम्बो ड्रोन, 1.11 कोटींचे 2.291 किलो ग्रॅम सोने, 52.50 लाखांचा 4,379 पॅकेट्समधील उच्च दर्जाचा अमेरिकन तंबाखू आणि 8 जुने लॅपटॉप मिळून 2 कोटी 12 लाख 61 हजार 92 रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. अमेरिकन तंबाखूच्या 30 ग्रॅमच्या एका पॅकेटची किंमत 1,999 रुपये इतकी आहे.

संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

याप्रकरणी वासिद अली खान (सिवान, बिहार), जुनेदुल हक्क (तांडेल गल्ली, मुंबई), जुनेत अफझल शेख (चिरा बाजार, मुंबई), मुहंमद अयुब (बिजनोर, उत्तर प्रदेश) आणि मोहसीन राजा (कौशंबी, उत्तर प्रदेश) या संशयितांना मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. संशयितांनी न्यायालयात केलेला जामीन अर्ज फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT