Suktali mollem Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : सुकतळी-मोले येथे दोन वाहनांचा भीषण अपघात; चौघे गंभीर जखमी

पोलिस घटनास्थळी दाखल; जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

Rajat Sawant

Suktali Mollem Car Accident : मोले सुकतळी टेट्रा फॅक्टरीजवळ आज दोन कारमध्ये झालेल्या अपघातात छत्तीसगड येथील तिघेजण जखमी झाले. ज्युलिओ रेव्हिडो आणि महिला नरून निसा अशी जखमींची नावे आहेत. तर दुसऱ्या कारमधील चालक मंजुनाथ बी. सिद्धगेरेमठ आणि नागराज अश्विन (दोघेही धारवाड) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

कुळे पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी 11.45 वाजता घडला असून काळ्या रंगाची कार (क्र. जीए 07 सी 8701) फोंड्याहून मोलेच्या दिशेने येत होती. तर धारवाड येथून फोंड्याच्या दिशेने येणारी इनोव्हा कार (क्र. केए 25 झेड 7555 ) सुकतळी टेट्रा फॅक्टरीजवळ राष्ट्रीय महामार्गावर आली असता दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. कार चालक ज्युलिओ व नरुन मिसा आणि इनोव्हा कार चालक मंजुनाथ यांना

इनोव्हा कार व अल्टो कार यांच्यात समोरा समोर अपघात झाल्याने पणजी तिसवाडी येथील अल्टो कार चालक कार चालक ज्युलिओ व नरुन मिसा गंभीर जखमी झाले तर इनोव्हा कार चालक मंजुना व नागराज अश्विन रा. धारवाड किरकोळ जखमी झाले आहेत.

अल्टो कारमधील ज्युलिओ व नरुन निसा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक अजय धुरी यांनी अपघाताचा पंचनामा केला. जखमींना अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT