Calangute: क्रॉस मसाजच्या नावाखाली कळंगुटमध्ये हरियाणाच्या दोन पर्यटकांची लुबाडणूक; दोघांना अटक

मसाज मिळत नसल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले मात्र, त्यांना रेस्टॉरंटमधील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले.
Two Haryana tourist duped on pretext of cross massage in Calangute
Two Haryana tourist duped on pretext of cross massage in CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

Two Haryana tourist duped on pretext of cross massage in Calangute: कळंगुट येथे क्रॉस मसाज पुरविण्याच्या नावाखाली हरियाणा येथील दोन पर्यटकांची लुबाडणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी कळंगुट (Calangute) येथील मसाज पार्लरच्या दोन कामगारांना अटक केली आहे. शनिवारी (दि. 03) दुपारी ही घटना घडली.

विनीत राठोड व शुभम जिल्लेवार असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर, रवी चव्हाण आणि जीवन असे फरार असलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

पर्यटकांची लुबाडणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अरूण मलिक (रा. हरियाणा) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 323, 506 (ii), 342, 420 व 392 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two Haryana tourist duped on pretext of cross massage in Calangute
Molcornem Quepem: दुर्दैवी! अखेरपर्यंत लढला पण हरला; मळकर्णे येथे पाण्यात पडलेल्या गव्याचा अंत

मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मलिक व त्यांच्या मित्राला संशयित रवी आणि जीवन यांनी मसाज देण्याची हमी दिली. त्यानतंर दोघांना घेऊन ते ज्युपीटर रेस्टॉरंट आणि मसाजमध्ये घेऊन गेले. दोघांनी त्यांच्याकडून 32 हजार रूपये घेतले तसेच, दोन युवतींच्या दारूचे पैसे मागितले.

मसाज मिळत नसल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले मात्र, त्यांना रेस्टॉरंटमधील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. व नंतर बाहेर सोडण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस अधिक तापस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com