Buffalo Accident Dainik Gomantak
गोवा

भरधाव ट्रकने दोन म्हशींना उडवलं

मुंबई गोवा महामार्गावर गिरी परिसरातील घटना.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन म्हशींना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हापसा शहराजवळ गिरी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Buffalo Accident in Mapusa Goa News)

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा (Mapusa) शहराजवळ गिरी भागात सोमवारी एका भरधाव ट्रकची धडक म्हशींना बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गेल्या आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी अपघातांचे (Accident) प्रमाण वाढल्याचं चित्र आहे.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अनेकदा अपघातांमध्ये मुक्या जनावरांना आपला नाहक जीव गमवावा लागतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. यामुळे पर्यटक (Tourist) आणि कामानिमित्त या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT