Goa Accident:  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दुचाकीला ठोकर देत कारचालक पळाला; म्हापशात दोघे जखमी

Goa Accident: पेडे म्हापसा येथे कारने दुचाकीला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Accident: पेडे म्हापसा येथे कारने दुचाकीला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

कारचा टायर फुटल्याने संशयित चालकाने अपघातानंतर कार घटनास्थळीच टाकून पोबारा केला. संशयित दारूच्या नशेत कार चालवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघातात दुचाकीस्वार मोंतू प्रधान (२४) आणि जोगिंदर शाहू (२०) हे जखमी झाले असून ते कोलवाळ येथे राहतात. ते मूळ ओडिशा येथील आहेत. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

तर मॉरिसन जोजफ मार्टिन्स (रा. जोजफवाडा, कुचेली) असे संशयित कार चालकाचे नाव आहे. त्याची मद्यप्राशन चाचणी म्हापसा पोलिसांनी घेतली आहे.

हा अपघात रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पेडे येथील मंदार गॅरेज जवळ घडला. जखमी दुचाकीस्वार एमपी ०९ एमटी ०७४८ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पेडे जंक्शन वरून जिल्हा इस्पितळाच्या देशेने जात होते तर विरूद्ध दिशेने संशयित जीए ०३ पी ३६५१ क्रमांकाच्या कारने जात होता.

वाटेत मंदार गॅरेज जवळील खुरसाकडे येथे कारने चुकीच्या दिशेने जाऊन मोटरसायकलला जोरदार ठोकर मारली.

कारचा टायर फुटला

या अपघातात दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. तर अपघात घडताच कारचे एक चाक फुटले. तरीही संशयिताने अंदाजे १०० मीटरवर गाडी नेली व जखमींना त्याच स्थितीत टाकून घटनास्थळावरून पळ ठोकली.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून जखमींना प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व त्यानंतर गोमेकॉत पाठवण्यात आले. या अपघात प्रकरणी संशयित कार चालक मॉरिसन मार्टिन्स याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार समीर नाईक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

Goa Live Updates: विजय सरदेसाई यांनी दारू तस्करीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले

Digambar Singbal: स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक! कोकणी नाटकांची प्रतिमा बदलणारे 'दिगंबर सिंगबाळ'

SCROLL FOR NEXT