Goa BJP: वास्‍को, मुरगावात विजयोत्‍सव; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Goa BJP: दुचाकी रॅली : केकही कापला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa BJP: मध्‍यप्रदेश, राजस्‍थान व छत्तीसगड या तीन राज्‍यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला झेंडा फडकावल्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्‍ये उत्‍साह संचारला आहे. गोव्‍यातही जल्लोष सुरू आहे. मुरगाव व वास्को मतदारसंघात दुचाकी रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्‍यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Goa BJP
Goa Police: मिझोरामयेथील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे गोव्याशी नाते

या विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगाव मतदारसंघात आमदार संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीची सुरूवात केक कापून करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक, सर्वानंद भगत, तुळशीदास नाईक, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वास्को मतदारसंघातही आमदार दाजी साळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी साळकर यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीला श्री दामोदर मंदिराकडून प्रारंभ झाला.

Goa BJP
Goa Rape Case: अल्पवयीनांवर बलात्कार गोव्यात सर्वाधिक; एनसीआरबीचा धक्कादायक खुलासा

त्‍यानंतर ती बेलाबाय, मेस्तवाडा, बायणा, मांगूरहिल, शांतीनगर, नवेवाडे, गोवा शिपयार्डमार्गे परत दामोदर मंदिराकडे आली व तेथे रॅलीची सांगता झाली. यावेळी वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, स्वराज नाईक, दिलीप काजळे, संदीप नार्वेकर, प्रशांत नार्वेकर, कृष्णा सातार्डेकर यांच्‍यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचा विजय गोव्‍यातही चैतन्‍य आणणारा : अँथनी बार्बोझा

राजस्‍थान, मध्‍यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्‍यांत भाजपने जो दणदणीत विजय मिळविलाय, त्‍याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांना जाते. या विजयामुळे गोव्‍यातील भाजप कार्यकर्त्यांमध्‍ये चैतन्‍य निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया एसटी मोर्चाचे उपाध्‍यक्ष अँथनी बार्बोझा यांनी व्‍यक्‍त केली.

लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून गोव्‍यातील दोन्‍ही जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येतील याची ग्‍वाही देणारा हा निकाल आहे. तेलंगणासारख्‍या राज्‍यात मागच्‍या निवडणुकीत भाजपचा एकच उमेदवार निवडून आला होता. तेथे आता ८ आमदार निवडून आले आहेत.

मिझोराममध्‍येही भाजपचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. यातून भाजप सगळ्‍याच ठिकाणी पुढे येऊ लागला आहे हे स्‍पष्‍ट होते असे बार्बोझा म्‍हणाले. या निवडणुकांचा निकाल म्‍हणजे मतदारांनी भाजपच्‍या विकासाला दिलेला हा कौल आहे. याची जाणीव गोव्‍यातील जनतेलाही आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याचा चांगला विकास होत आहे. त्‍यामुळे येत्‍या लोकसभा निवडणुकीत गोव्‍यातील दोन्‍ही जागांवर भाजपचे उमेदवारच निवडून येतील हे नक्‍की झाले आहे असेही बार्बोझा म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com