Goa News: परशुरामाचा पुतळा पोट भरणार का? उदय भेंब्रे

Goa News: राज्य सरकारने मांडवी नदीच्‍या किनारी परशुरामाचा पुतळा उभारला. पुतळा कोणास नोकरी देत नाही, कोणाचे पोट भरत नाही आणि कोणास शिक्षणही देत नाही.
Uday Bhembre
Uday BhembreDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्य सरकारने मांडवी नदीच्‍या किनारी परशुरामाचा पुतळा उभारला. पुतळा कोणास नोकरी देत नाही, कोणाचे पोट भरत नाही आणि कोणास शिक्षणही देत नाही. लोकांना विश्‍वासात न घेता तो उभारला. त्याच्यावर किती कोटी रुपयांचा खर्च झाला, तेही लोकांना विश्‍वासात घेऊन सांगितले नाही.

Uday Bhembre
Goa BJP: वास्‍को, मुरगावात विजयोत्‍सव; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गरज नसतानाही हा खर्च झाला आहे, तो नष्ट करावा, अशी मागणी कोकणी लेखक ॲड. उदय भेंब्रे यांनी केली आहे.

ॲड. भेंब्रे यांचा हा 20 मिनिटे 5 सेकंदांचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्‍यांनी राज्य सरकारच्या कारभारावर उघडपणे टीका केली आहे. काही काळापूर्वी लोकांच्या सेवेचे एक साधन म्‍हणून राजकारणाकडे पाहिले जात होते. आता ती लोकसेवा बाजूला पडली आहे. गोव्यात राजकारण आणि स्वार्थ एकमेकांना घेऊन पुढे सरकत आहेत, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

Uday Bhembre
Goa Sunburn 2023: ‘सनबर्न’ नाही तर मग तिकीट विक्री का सुरू? विजय सरदेसाई यांचा सवाल

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सहा खाती आहेत आणि त्यातील सर्वात जास्त आर्थिक तरतुदीची चार खाती. गृहखाते, वित्त, शिक्षण, कार्मिक व प्रशासन. साबांखा व राज्यभाषा खातेही त्‍यांच्‍याकडेच आहे. नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून काढल्यानंतर त्यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे न देता मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे ठेवले. या सर्व खात्यांना मुख्यमंत्री न्याय देऊ शकत नाहीत. ते सकाळ-संध्याकाळ कार्यक्रमांत व्यस्त असतात. त्यांना उत्सव लागतात, दिल्लीलाही अधूनमधून जावे लागते, असे भेंब्रे म्‍हणतात. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे.

राज्‍यावर 35 हजार कोटींचे कर्ज!

2021-22 मध्ये राज्याच्या डोक्यावर 31 हजार कोटींचे कर्ज होते. आता दीड वर्षांचा काळ गेला असल्याने ती रक्कम 35 हजार कोटींवर गेली असेल. ते कर्ज कसे फेडणार? या पैशांचा लाभ लोकांना मिळाला असेही नाही. वायफळ खर्च झाल्याने कर्ज वाढत गेले. अवघ्‍या 16 मिनिटांच्या शपथविधीसाठी 16.5 कोटी खर्च करण्‍यात आला. ही उधळपट्टी नव्‍हे का? असा सवाल भेंब्रे यांनी उपस्‍थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com