bangladeshi in goa Dainik Gomantak
गोवा

'ATS' चा कारवाईचा धडाका सुरुच; गोव्यातून आणखी दोन बांगलादेशी ताब्यात

कळंगुट, बागा येथे केली धरपकड

दैनिक गोमन्तक

गोव्यात बांगलादेशी नागरिकांच्या (Bangladeshi Nationals In Goa) मुद्द्याने उचल खाली असून, राज्यात गेल्या काही दिवसांपासून घुसखोरी झाली असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यानूसार पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत आज पुन्हा दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.

(Two Bangladeshi nationals held by goa anti Terrorism Squad at Calangute and Baga )

मिळालेल्या माहितीनुसार गोवा दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. यात कळंगुट, बागा परिसरात छापेमारी केली आहे. यावेळी 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एका महिलेकडून पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तसेच आणखी घुसखोरी या परिसरात झाली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

एकाच दिवशी गोव्यातील 22 बांगलादेशींना घेतलं ताब्यात

22 सप्टेंबर 2022 रोजी देशभर छापेमारी करत 100 पेक्षा जास्त संशयितांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. याचाच भाग म्हणून गोव्‍यात वास्को, कुंकळ्‍ळी येथेही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एनआयए, सीबीआय, जीएसटी, इन्कम टॅक्स, एनसीबी, ईडी आधी तपास यंत्रणांचे सदस्य सहभागी होते. यावेळी तब्बल 22 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे.

खोट्या आधारकार्डच्या आधारे गोव्यात वास्तव्य

ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून सर्व प्रकारचा तपशील मिळवण्यात आला असून खोट्या आधारकार्डच्या आधारे हे लोक गोव्यात राहत होते, हे स्पष्ट झाले आहे. तर काहीजणांकडे कोणत्याच प्रकारची कागदपत्रे नाहीत, अशी माहिती एटीएस सूत्रांनी दिली आहे.

गोव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी रहिवास केल्याची प्रकरणे समोर येत असल्यामूळे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यानूसार ज्या ठिकाणी अशा प्रकारे घुसखोरी झाल्याचा संशय आहे, त्या ठिकाणांवर पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT