Anjuna Crime  Dainik Gomantak
गोवा

Anjuna: हणजूण येथे एक लाख रूपयांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

पोलिसांच्या क्राईम ब्रँच पथकाची कारवाई; चरस, गांजा जप्त

Akshay Nirmale

Anjuna: नवीन वर्षांच्या पार्ट्यांना गोव्यात सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकारही समोर येत आहेत. गेल्या काही काळात पोलिसांनी सातत्याने अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक प्रकार उघडे पाडले आहेत. नुकतेच पोलिसांच्या क्राईम ब्रँच शाखेने हणजून येथेही अशीच कारवाई केली आहे.

हणजूण येथील कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यात 74 ग्रॅम चरस आणि 92 ग्रॅम गांजाचा समावेश आहे. हफजल हबीब (43) आणि प्रीतेश संगम (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पैकी हबीब हा मूळचा केरळचा आहे. तर प्रीतेश हा हणजूण येथीलच रहिवाशी आहे.

दोनच दिवसांपुर्वी 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांनी ठाणे रेल्वेस्थानकावर एकाला पकडले होते. त्याच्याकडे चार किलो चरस सापडला होता. मुंबई आणि गोव्यात हे चरस विकले जाणार होते. त्याची किंमत 8 लाख रूपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT