Goa Dairy : गोवा डेअरीकडून गोमंतकीयांना नववर्षाची 'ही' भेट

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
Goa dairy
Goa dairyDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत गोवा डेअरीच्या सद्यस्थितीसंबंधी चर्चा झाली. तसेच गोवा डेअरीसंबंधी अन्य विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली व योग्य निर्णय घेण्यात आले. यावेळी बैठकीत श्रीकांत नाईक हे संचालक वगळता इतर सर्व संचालक उपस्थित होते. गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नूतन व्यवस्थापकीय संचालकही उपस्थित होते.

Goa dairy
GMC : गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली सर्वात अवघड शस्त्रक्रिया...

या बैठकीत गोवा डेअरीच्या सद्यस्थितीसंबंधी चर्चा झाली. गोवा डेअरी सध्या नुकसानीत असल्याने नफा वाढवण्यावर भर देण्यासंबंधी चर्चा झाली. मागच्या बऱ्याच काळापासून गोवा डेअरीला नुकसानी सोसावी लागत आहे. त्यामुळे दूध दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही, असाच सूर मागच्यावेळी व्यक्त झाला होता. या बैठकीत गोवा डेअरीचे वितरण व मार्केटिंग यासंबंधीचा सविस्तर निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरले. गोवा डेअरीसंबंधी अन्य विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली व योग्य निर्णय घेण्यात आले.

गोवा डेअरीच्या बैठकीत दूध दरवाढीसंबंधी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. वास्तविक या बैठकीत दूध दरवाढ करण्यात येईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. गोवा डेअरी सध्या नुकसानीत असल्याने दूध दरवाढ हाच त्यावर पर्याय होता, पण संचालक मंडळाने तुर्तास हा विचार पुढे ढकलला असून गोवा डेअरीच्या दुधाचे राज्यातील वितरण आणि सद्यस्थिती यासंबंधीचा अहवाल आल्यानंतरच पुढील विचार करण्यासंबंधी बैठकीत विचार झाला.

Goa dairy
Margao : मडगावात बर्निंग कारचा थरार; भरधाव गाडीने घेतला पेट, सुदैवाने चालक बचावला

विशेष म्हणजे गोवा डेअरीत मागच्यावेळी झालेली नोकरांची खोगिरभरतीचा विषयही चर्चेला आला. गरज नसताना मागच्या काळात अतिरिक्त कामगारांना सेवेत घेण्यात आले आणि घाईगडबडीत त्यांना सेवेतही कायम करण्यात आले. नंतरच्या काळात काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तर अन्य कामगारांसंबंधीच्या विषयाचा निर्णय झालेला नाही. याबाबत कायदेशीर बाजू तपासून व सल्ला घेऊनच पुढील कारवाई करण्याचे निश्‍चित झाले. मार्केटची स्थिती पाहूनच पुढील बैठकीत कदाचित दरवाढीचा निर्णय होऊ शकतो. दरम्यान, गोवा डेअरीच्या दूध संकलनात वाढ करण्याबरोबरच व्यवस्थित मार्केटिंग व इतर बाबींवर उहापोह झाला. मागच्या काळात गोवा डेअरीचे दूध संकलन रोडावले होते, ते पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून पुढील काळात यश अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com