threatening former Aldona MLA Glenn Ticlo | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Glenn Ticlo : माजी आमदार टिकलोंना दमदाटी, दोघांना अटक

तीन तरुणांच्या विरोधात तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

Glenn Ticlo : हळदोणा मतदारसंघाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांना दमदाटी करीत त्यांच्या आलिशान कारगाडीची नासधूस केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांत संशयित सर्वेश दिवकर, मेलकॉम फर्नांडिस तसेच जॉयलन या तीन तरुणांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून आतापर्यंत दोघांना याबाबतीत कायदेशीर अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मारहाण प्रकरणात सहभागी तिसरा संशयित जॉयलन फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडल्याचे कळंगुट पोलिसांनी सांगितले. ग्लेन टिकलो यांचे कळंगुट -बागा रस्त्यावर रिसॉर्ट आहे.

शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणेच टिकलो दैनंदिन व्यवहार आटोपून आपल्या म्हापसा येथील घरी निघाले असता पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या संशयित सर्वेश दिवकर यांनी त्यांना रस्ता अडवल्याचेनिमित्त करून टिकलो यांच्या ड्रायव्हरशी हुज्जत घातली.

बाचाबाची वाढतच गेल्याने संशयित सर्वेश दिवकर यांनी त्वरित मोबाईल वरून संपर्क साधत मेलकॉम फर्नांडिस तसेच जॉयलन या आपल्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले व तिघांनी मिळून टिकलो यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गाडीची नासधूस केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT