Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: शिवोलीत पर्यटकांना मारहाण; दोघांना अटक

Goa Tourism: वाडी-शिवोलीतील एका नामांकित रेस्टॉरंटच्या पार्कींग लॉबीत दिल्लीतील दोघा पर्यटकांना जबर मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण प्रकाश पाथरुड आणि जलील अहमद या दोघा बाउन्सरना हणजूण पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: वाडी-शिवोलीतील एका नामांकित रेस्टॉरंटच्या पार्कींग लॉबीत दिल्लीतील दोघा पर्यटकांना जबर मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण प्रकाश पाथरुड आणि जलील अहमद या दोघा बाउन्सरना हणजूण पोलिसांनी अटक केली आहे.

पार्किंग जागेत आपल्या दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरून या बाउन्सरनी दोघा पर्यटकांना मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी घडल्यानंतर पर्यटकांनी हणजूण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार हणजूण पोलिसांनी या दोघा बाउन्सरना रात्री उशिरा अटक केली.

शैलेश झा आणि शाहीद फाजल हे दिल्लीस्थित पर्यटक वाडी-शिवोलीतील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये आले होते.

यावेळी पार्किंग करताना त्यांच्या कारची धडक पाथरुड आणि जलील अहमद यांच्या दुचाकीला बसल्यानंतर त्यांच्यात वाद होऊन ही मारहाण झाली.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक स्नेहा सावळ, निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT