Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: सागवान लाकडाची तस्करी करताना दोघांना अटक; मायना सुकूरमधील घटना

गोवा पोलिसांची कारवाई, टेम्पो जप्त

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: सागवानची झाडे कापून लाकडाची तस्करी करणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मायना सुकूरमध्ये पर्वरी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोघाही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे या चोरीसह इतरही प्रकरणांबाबत चौकशी केली जात आहे.

बाबूराव हळर्णकर (रा. मायना सुकूर) आणि आंतानियो फर्नांडिस (रा. सांता क्रुझ, पणजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जीए 07 एफ 5073 या टेम्पोतून या लाकडाची तस्करी केली जात होती. या दोघांनी सागवानची तीन झाडे कापली होती.

त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पोलिसांना याची कुणकुण लागली होती. पोलिसांनी पाळत ठेऊन हा टेम्पो पकडला. यातून सागवानी लाकडाची तस्करी केली जात होती. ही लाकडेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT