Goa Police Dainik Gomantak
गोवा

'त्या' जुळ्या बहिणींची गुन्हे शाखेकडून दोन तास चौकशी

इन्स्टाग्रावर पोस्ट करण्यासाठी वापरलेले मोबाईल फोन जप्त

Rajat Sawant

दोन जुळ्या बहिणींनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रावर केल्याची घटना उघडकीस आली होती. गोवा पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन्ही जुळ्या बहिणींना समन्स बजावले होते.

दरम्यान, गुरुवारी दोन्ही जुळ्या बहिणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे दोन तास चौकशी केली. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रावर करण्यासाठी वापरलेले मोबाईल फोन जप्त केले.

दुसरीकडे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश गैरहजर असल्याने गुरुवारी सुनावणी होऊ शकली नाही. ही सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सारा आणि साझिया या दोघी जुळ्या बहिणींनी धार्मिक तेढ निर्माण करतील अशा अश्लील आणि अपमानजनक गोष्टी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या असा आरोप करण्यात आला आहे. अश्लील पोस्ट करत त्यांनी शिवलिंगाचा उघडपणे अपमान केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत एका व्यक्तीने ट्विटरद्वारे गोवा पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT