धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी गोव्यातील 'त्या' दोन जुळ्या बहिणींना गुन्हे शाखेचे समन्स

मागील काही दिवसांपूर्वी गोव्यात दोन शाळकरी मुलींनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रावर केल्याची तक्रार सोशल मिडियावरून करण्यात आली होती.
Hindu Deities Criticism in Goa
Hindu Deities Criticism in GoaDainik Gomantak

मागील काही दिवसांपूर्वी गोव्यात दोन शाळकरी मुलींनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रावर केल्याची तक्रार सोशल मिडियावरून करण्यात आली होती.

याची गोवा पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन्ही जुळ्या बहिणींना समन्स बजावले आहे.

(Crime Branch Goa Police Summoned twin sisters who allegedly made Religiously Derogatory remarks on Instagram)

सीआरपीसीच्या कलम 41 (ए) कलम 153-ए (धार्मिक भावना दुखावणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत दोन्ही बहिणींना समन्स बजावण्यात आले आहे. गन्हे शाखेने दोघींना गुरूवारी रायबंदर येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यानंतर, इन्स्टाग्रावर या दोघींना वादग्रस्त पोस्ट केल्याचे एका ट्विटर वापरकर्त्यांने सार्वजनिक केले होते.

तसेच, यासंबधी कारवाईची मागणी गोवा पोलिसांकडे करण्यात आली. गोवा पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणाची आता मुलींकडून गुरूवारी चौकशी केली जाणार आहे.

Hindu Deities Criticism in Goa
युपीत अतिकची हत्या! गोव्यात दोन शाळकरी मुलींची हिंदू देवतांविरोधात पोस्ट; गुन्हा दाखल

काय आहे नेमकं प्रकरण?

सारा आणि साझिया या दोघी जुळ्या बहिणींनी धार्मिक तेढ निर्माण करतील अशा अश्लील आणि अपमानजनक गोष्टी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या असा आरोप करण्यात आला आहे. अश्लील पोस्ट करत त्यांनी शिवलिंगाचा उघडपणे अपमान केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत एका व्यक्तीने ट्विटरद्वारे गोवा पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com