Tuyem Hospital OPD Dainik Gomantak
गोवा

Tuyem Hospital: तुये इस्‍पितळात होणार 12 ‘ओपीडीं’चा समावेश! आरोलकरांची ग्‍वाही; लवकरच गोमेकॉशी होणार लिंक

Tuyem Hospital OPD: जीएमसीमध्ये सुरू असलेल्या ओपीडीप्रमाणेच तुये हॉस्पिटलमध्येही रुग्णांना उपचार मिळणार आहेत, असेही आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: पेडणे तालुक्यातील तुये येथील शंभर खाटांचे इस्‍पितळ लवकरच गोमेकॉशी लिंक केले जाईल. या इस्‍पितळात १२ ओपीडी सुरू होणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होतील, अशी ग्‍वाही मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

तुये हॉस्पिटल हे गोमेकॉशी लिंक होत असल्‍यामुळे पेडणेवासीयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून, ३० जानेवारीच्या आत हॉस्पिटलच्या सुविधांबद्दल अधिक माहिती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. गोमेकॉच्या पद्धतीने तुये हॉस्पिटलमध्येही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा लोकांना मिळेल, असे आरोलकर यांनी स्पष्ट केले.

हॉस्पिटल सुरू झाल्यावर तिथे १२ ओपीडी सुरू होतील आणि प्रत्येक ओपीडीसाठी योग्य डॉक्टर असतील. जीएमसीमध्ये सुरू असलेल्या ओपीडीप्रमाणेच तुये हॉस्पिटलमध्येही रुग्णांना उपचार मिळणार आहेत, असेही आरोलकर यांनी स्‍पष्‍ट केले.

सुविधांचा करणार विस्तार

तुये हॉस्पिटलमध्ये लवकरच एक मिनी ऑपरेशन थिएटर सुरू करण्‍यात येईल आणि मुख्य ऑपरेशन थिएटर दोन ते तीन महिन्यांच्या आत कार्यरत होणार आहे. त्‍यासाठी ११ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आले आहे.

लक्ष ठेवण्यासाठी समिती स्‍थापन

तुये हॉस्पिटल लिंक झाल्यानंतर नागरिकांना योग्य सेवा मिळाव्यात यासाठी पेडणे तालुका नागरिक समितीने आज रविवारी रुग्णालय पायाभूत सुविधा पर्यवेक्षण आणि रुग्णसाहाय्य समितीची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून प्रणव परब, उपाध्यक्ष माधुरी गाडगीळ, देवेंद्र परब, नितीन पटेकर आणि सचिव विनायक कामत यांची निवड करण्‍यात आली. ही समिती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, औषधे, एक्स-रे, अल्ट्रासाऊंड आणि वॉर्ड सुविधा वेळेवर उपलब्ध होतात की नाही यावर लक्ष ठेवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT