cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Tuyem Government Hospital inauguration February: तुये येथील सरकारी इस्पितळ व संशोधन केंद्र (गोमेकॉ सलग्न) २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी सरकारने गतीने तयारी सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: तुये येथील सरकारी इस्पितळ व संशोधन केंद्र (गोमेकॉ सलग्न) २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी सरकारने गतीने तयारी सुरू केली आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीस राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २ फेब्रुवारी रोजी तुये येथील इस्पितळाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. इस्पितळाच्या सुरुवातीच्या कामकाजासाठी तूर्त कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जातील. त्‍यानंतर नियमित कर्मचारी भरती गोवा लोकसेवा आयोग व गोवा (Goa) कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, या इस्पितळासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहेत. तुये इस्पितळासह सांगेतील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा इस्पितळांतील आपत्कालीन कक्षांसाठी एकूण ९७ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. बंदर कप्तान खात्यात उपकप्तान या नव्या पदाची निर्मिती केली आहे.

गोमेकॉत १५ पदे करार तत्त्‍वावर

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, शस्त्रक्रिया व नेत्ररोग विभागात व्याख्याते व साहाय्यक प्राध्यापक यासाठी १५ पदांची करार पद्धतीने भरती मंजूर करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य खात्यातील विविध पदांची भरती ही नियमित नियुक्त्यांपूर्वी करार पद्धतीने केली जाणार आहे, असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भरावयाची पदे

 परिचारिका : ५०

 रेडिओलॉजिस्ट : ५०

 एमटीएस : २५

 हाऊसकिपिंग स्टाफ : १०

 सिक्युरिटी स्टाफ : १०

 ईसीजी टेक्निशियन : १

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT