Tuyem Hospital News Dainik Gomantak
गोवा

Tuyem: तुये सामुदायिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यास आक्षेप, नव्या इमारतीवर फलक लावण्यात आल्याने वाढला संभ्रम

Tuyem Hospital News: तुयेतील सामुदायिक आरोग्य केंद्र नवीन इमारती स्थलांतरित करून त्याला उपजिल्हा इस्पितळाचा दर्जा देणार असल्याचे विधान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

Sameer Panditrao

मोरजी: तुयेतील सामुदायिक आरोग्य केंद्र नवीन इमारती स्थलांतरित करून त्याला उपजिल्हा इस्पितळाचा दर्जा देणार असल्याचे विधान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. मात्र याला तुये हॉस्पिटल कृती समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. या इमारतीत जीएमसीशी संलग्न व डींनच्या अख्यारित्याखाली इस्पितळ असावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दरम्यान, नव्या इमारतीवर आरोग्य सामुदायिक केंद्राचा फलक लावल्यामुळे संभ्रम वाढला आहे.

तुये हॉस्पिटल कृती समितीची बैठक नुकतीच पेडणे येथे पार पाडली. यावेळी आरोग्य मंत्र्यांच्या विधानावर चर्चा करण्यात आली. तुये सामुदायिक केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित करून त्याला उपजिल्हा इस्पितळाचा दर्जा देण्यास यावेळी विरोध करण्यात आला.

ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पेणेकरांच्या डोळ्यात पाणी लावण्याचा हा प्रकार असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व पंचायती व पालिकेने ठराव घेतला असतानाही सरकार आपलेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करत आहे, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. नव्या इमारतीत सामुदायिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केले तर त्याला आमचा विरोध असेल असे तुयेचे पंच नीलेश कांदोळकर यांनी सांगितले.

इमारत अजून ताब्यात नाही

आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता साधन सुविधा विकास महामंडळाने ही इमारत अजून आरोग्य खात्याच्या ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे या इमारतीवर कोणता फलक लावला असेल तो चुकीच्या मार्गाने लावला असेल. या इमारतीत गोमेकॉशी संलग्न हॉस्पिटल सुरू करण्याची सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT