Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa: मोरजी किनारा कमर्शियल झोन झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम; कासवांचेही आगमन लांबले

नाताळाचे दिवस येऊन गेल्यानंतरही कासवांचे आगमन होत नसल्याने या कासवांवर हवामानाचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

दैनिक गोमन्तक

Goa: 1997 सालापासून मोरजी-तेमवाडा किनारी भागात कासव संवर्धन मोहीम राबविली जाते. ही मोहीम यशस्वी करत असतानाच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे मोरजी, आश्वे मांद्रे हा किनारा सायलेंट झोन म्हणून जाहीर केला होता. परंतु 2022 रोजी पुन्हा हा किनारा कमर्शियल झोन झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कमर्शियल झोन झाल्यामुळे व्यावसायिक समाधानी आहेत. तर सायलेंट झोन नसल्यामुळे पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदा सागरी कासवांचे आगमन लांबणीवर पडले आहे.

सागरी कासव येऊन किनारी भागात दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अंडी घालायला सुरुवात करतात. परंतु यंदा नाताळाचे दिवस येऊन गेल्यानंतरही कासवांचे आगमन होत नसल्याने या कासवांवर हवामानाचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

मोरजी तेमवाडा किनारी भागात वन खात्यातर्फे 1998 ते आजपर्यंत राबवलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेंतर्गत 217 कासवांनी मिळून 23.703 अंडी घातली.

त्यातील 14.633 पिल्ले सुरक्षित सोडली, तर 6.636 अंडी खराब व 1.441पिल्ले जन्मताच मरण पावली. किनारी जर शांततेचा भंग होत असेल, रात्रीच्या वेळी दारूकामाची आतषबाजी केल्यास, त्याचा परिणाम होतो.

पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुर्मीळ कासवांची माहिती व अभ्यास करण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. मात्र, कायमस्वरूपी या ठिकाणी अभ्यास केंद्र नसल्यामुळे नागरिक आणि पर्यटकांची बरीच गैरसोय होते.

सरकारने 2002 साली कासावांसाठी 500 चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सीआरझेड कायद्यामुळे अडचणी येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

SCROLL FOR NEXT