Panjim: पणजीचा बाह्यविकास आराखडा लोकांसाठी उपलब्ध

पणजी विधानसभा मतदारसंघाची रचना जी मिरामारपासून सुरू होते, त्याचपद्धतीने हा आराखड्याचा मसूदा तयार करण्यात आल्याचे दिसते.
Panjim Development planning
Panjim Development planningDainik Gomantak

Panjim: पणजी बाह्यविकास आराखड्याचा 2031चा मसुदा जाहीर झाला आहे. नगर नियोजन विभागातर्फे (टीसीपी) हा आराखडा लोकांसाठी खुला झाला असून, त्या आराखड्यातून ताळगावचा काहीसा भाग वगळण्यात आला आहे. हा मसुदा सध्या टीसीपीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यापूर्वी 2018 मध्ये जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्यात ताळगाव मतदारसंघातील काही भाग जो महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग म्हणून निश्‍चित आहे, तो नव्या मसुद्यातून वगळण्यात आला आहे.

पणजी विधानसभा मतदारसंघाची रचना जी मिरामारपासून सुरू होते, त्याचपद्धतीने हा आराखड्याचा मसूदा तयार करण्यात आल्याचे दिसते.

Panjim Development planning
Kalasa Cannal: कळसा प्रकल्पामुळे समुद्राचा खारटपणा वाढणार

उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पणजी ओडीपी महापालिकेच्या अखत्यारित आहे. महापालिकेत 2021चा आराखड्याचा जो नकाशा दाखविण्यात आला आहे, त्याचपद्धतीचा हा नकाशा आहे.

टीसीपीने जाहीर केलेल्या नव्या आराखड्यातून ताळगाव सांताक्रूझचा काहीसा भाग वगळण्यात आल्याचे दिसते. ताळगावचा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा अधिकतर भाग नव्या आराखड्यात नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com