तुळशीदास नाईक  Dainik Gomantak
गोवा

Goa: नारायण नाईक यांच्या हल्लेखोरांना लवकर अटक करा: तुळशीदास नाईक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) लवकरच माझ्या भावावर हल्ला करणाऱ्यांना गजाआड करणार असल्याची आशा नाईक यांचे बंधू तथा साकवाळचे पंच तुळशीदास दत्ता नाईक यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

सांकवाळ पंचायतीसमोर माहिती हक्क कार्यकर्ता नारायण दत्ता नाईक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना राज्याचे गृह विभाग व मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत लवकरच गजाआड करणार असल्याची आशा नाईक यांचे बंधू तथा साकवाळचे पंच तुळशीदास दत्ता नाईक यांनी व्यक्त केली आहे. माझ्या बंधूवर हल्ला करणारा मुख्य सूत्रधार साकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर असून त्यांना या प्रकरणातून दिशाभूल करण्यासाठी प्रताप म्हार्दोळकर माझ्या बंधूवर बिनबुडीचे आरोप करत असल्याची टीका पंच तुळशीदास नाईक यांनी केली. (Tulshidas Naik has demanded immediate arrest of Narayan Naik's attackers)

वास्को येथे शुक्रवार (दि. 9) आयोजित पत्रकार परिषदेतून वरील माहिती दिली. पंच तुळशीदास नाईक यांनी पुढे बोलताना म्हणाले की माझ्या बंधूवर बायणातील गो हत्या करणाऱ्या कसाईकडून खुनी हल्ला करण्याची सुपारी बोरकर यांनी दिली असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केली. शनिवार (दि. 3) नारायण नाईक पंचायतीत येतात व बाहेर जाताना त्याच्यावर खूनी हल्ला होतो. तेथे पंचायतीत उपस्थित असलेला राम गोपाल यादव उर्फ (करिया) यावेळी नाईक यांना इस्पितळात घेऊन जातात आणि करिया सरपंच बोरकर यांना बोलावून माझ्या बंधूला इस्पितळात नेतात, हे सर्व एका प्रकारे षडयंत्र होते.

माझ्या बंधूंना सांकवाळ पंचायतीचे सरपंच बोरकर, करिया यांनी बायणा भागातील गो हत्या करणाऱ्या कसाईला हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असा आरोप पंच नाईक यांनी केला. गृहविभागाच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सरपंच बोरकर बरोबर माझ्या बंधूवर बिनबुडाचे आरोप करणारे दाबोळीचे रहिवासी प्रताप म्हार्दोळकर यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करावा अशी मागणी पंच नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केली.

सांकवाळचे सरपंच बोरकर यांनी साकवाळच्या जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर घरे बांधलेली आहेत. यात त्यांना प्रताप म्हार्दोळकर यांनी बऱ्यापैकी सहकार्य केले आहे. प्रताप म्हार्दोळकर यांनी सुद्धा बेकायदेशीररित्या सांकवाळ कोमुनिदादमध्ये जागा बळकावलेली आहे. म्हार्दोळकर यांनी सांकवाळ कोमुनिदादमधील एक घर पंधरा हजार रुपयांनी रमाकांत बोरकर यांच्या मुलाला परस्पर विकली असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून केली. प्रताप म्हार्दोळकर याला खून प्रकरणी कोठडी सुद्धा झालेली आहे. तर माझे बंधू नारायण नाईक यांच्यावर एक साधी तक्रार सुद्धा नसताना माझा बंधू खंडणी घेत असल्याचा बिनबुडाचा आरोप म्हादोळकर करीत आहे. जर त्यांच्याजवळ माझ्या बंधू विरुद्ध खंडणी घेत असल्याचा पुरावा असेल तर त्याने तो गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावा.

गृह विभागाच योग्य ती कारवाई माझ्या बंधूवर करेल. प्रताप म्हार्दोळकर, रमाकांत बोरकर यांनी सांकवाळ कोमुनिदादमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असून त्यांच्यावर कोमुनिदाद प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. कमी उत्पन्न गटातील कोमुनिदादची जागा बोरकर यांनी बळकावलेली असल्याचा आरोप पंच नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. कदाचित बोरकर, म्हार्दोळकर यांच्या विरोधात बोलल्यामुळे माझ्यावरसुद्धा हल्ला होऊ शकतो, अशी चिंता शेवटी पंच तुळशीदास नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT