Goa: रान डुक्कर उपद्रवी घोषणेचे सत्तरीतील शेतकऱ्यांकडून स्वागत

मुख्यमंत्र्यांचा (Chief Minister) धाडसी निर्णय ठरणार स्वयंपूर्ण बनण्यास होणार मदत, अंमलबजावणी त्वरित व्हावी ही अपेक्षा.
Goa Farm
Goa FarmDainik Gomantak

पिसुर्ले: गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी (Farmers) वर्गाकडून काही रानटी प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी होत होती, परंतू आता पर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) त्या पैकी एकाही प्राण्याला उपद्रवी म्हणून घोषित केले नव्हते, त्यामुळे सरकारांच्या कृषी विभागाकडून मिळत असलेल्या सवलती घेऊन आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा करण्यात महत्त्वाचें योगदान देणाऱ्या शेतकऱ्यां समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता, पण विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रान डुक्कर या प्राण्यांला उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केले, या निर्णयाचे सत्तरी तालुक्यातील तमाम शेतकरी वर्गाकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे सदर निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी करण्यात येत आहे. (Citizens in the Satari thanked for declaring the pig a nuisance)

सत्तरी तालुका हा राज्यात एक कृषी संपन्न भाग म्हणून गणला जात आहे, या परीसरातील शेतकरी काजू, नारळ, सुपारी, आंबे, पणस, केळी, पपया, अननस, भात, नाचणी अशा विविध प्रकारची शेती करून शेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे, त्याच प्रमाणे राज्यातील इतर तालुक्यात सुद्धा शेतकरी वर्गाने बदलत्या काळात सुद्धा आपला पारंपरिक शेती व्यवसाय सांभाळून ठेवला आहे, त्यात गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारच्या काळात कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविलेल्या विविध योजना या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी फार लाभदायक ठरल्या असल्याचे मत हेदोडे सत्तरी येथिल एक प्रगतीशील शेतकरी अशोक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

स्थानिक शेतकरी
स्थानिक शेतकरीDainik gomantak

यावेळी बोलताना अशोक जोशी यांनी सांगितले की सत्तरी तालुक्यात सुमारे सात आठ हजार शेतकऱ्यांनी रानटी प्राण्यां कडून होणारी नुकसान आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत अजून पर्यंत शेती व्यवसाय टिकवून ठेवला आहे, परंतू गेल्या काही वर्षांपासून रानटी प्राण्यांचा या भागांत वाढलेला संचार आणि त्यामुळे शेतीची होणारी नुकसानी यात शेतकरी चिरडला जात आहे, रक्ताचे पाणी करून तयार केलेल्या शेती बागायती रानटी प्राण्यांपासून उध्वस्त होत असल्याचे पाहून शेतकरी हैराण झाले आहे, त्यामुळे राज्य शेतकरी संघटना व तालुका पातळीवरील शेतकरी संघ यांच्या माध्यमातून सन 2016 सालापासून रान डुक्कर, माकड, खेती, शेक्रो, तसेच इतर काही प्राण्यांना उपद्रवी म्हणून जाहीर करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत होती.

मध्यंतरी या विषयाला चालना मिळाली होती, पण सदर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, परंतू राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची संकल्पना मांडताच गोवा राज्य विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याची योजना आखून त्या प्रमाणे पावले उचलली आणि शेतकऱ्यांना विविध सवलती देऊन, सद्या रान डुक्कर हा शेती साठी उपद्रवी प्राणी असल्याचे घोषित केले, त्यामुळे सत्तरी तालुक्या बरोबर राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सदर घोषणेचे स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले.

Goa Farm
इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकार निशाना

त्याच प्रमाणे सदर घोषणेची कारवाई त्वरित करून इतर राज्यांच्या धर्तीवर आणखीन काही प्राण्यांना उपद्रवी म्हणून जाहीर करावेत असे या शेवटी जोशी यांनी सांगितले.

राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोवा करण्याच्या अभियानात शेतकऱ्यांना विविध पातळीवर दिलासा देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत, त्यामुळे आज सुशिक्षित युवा शेती व्यवसायाकडे वळत आहे, त्यात काही दिवसांपूर्वीच शेतकरयांना त्रास दायक ठरणारा रान डुक्कर हा उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केले, त्यामुळे शेतकरी आनंदी आहे, मात्र त्या बरोबर इतर काही प्राण्यांना उपद्रवी म्हणून घोषित करावे असे अडवई सत्तरी येथिल युवा शेतकरी माणिकराव राणे यांनी सांगितले.

Goa Farm
Goa: CZMP सुनावणी एकाच दिवसात संपविल्याबद्दल नागरीकांमध्ये नाराजी

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना संकटातून वर काढण्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते खरंच कौतुकास्पद असून, रान डुक्करामुळे शेतकऱ्यांना बरेच नुकसान होत होते, त्याला उपद्रवी म्हणून घोषित करून शेतकऱ्यावर फार मोठे उपकार केले आहे, मात्र त्याची कारवाई लवकर व्हावी एवढीच अपेक्षा असे पिसुर्ले शिंगणे येथिल युवा शेतकरी महादेव गावडे यांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक शेतकरी
स्थानिक शेतकरीDainik gomantak

सत्तरी तालुक्यात बागायती शेती बरोबर इतर प्रकारच्या शेतीमध्ये सुद्धा शेतकरी अग्रेसर असून मोठ्या प्रमाणात भाजीपाला, तसेच इतर प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पादन या तालुक्यात केले जात आहे, त्यालाही राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलती दिल्या जातात, त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासूनचा राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळाला पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास गोवा राज्य येणाऱ्या काळात भाजीपाला लागवडीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये सन 2016-17 या वर्षी शेतकऱ्यांनी 560.54 टन भाजीपाला पुरवठा केला तर त्यांना 198.64 लाख मोबदला देण्यात आला, सन 2017-18 मध्ये 591.18 टन भाजीपाला दिला, त्यांना 208.23 लाख देण्यात आले, सन 2018-19 या साली 696.26 टन उत्पादन करून 271.49 लाख मिळवले, सन 2019-20 मध्ये 1008.80 टन उत्पादन करून 440.69 लाख रुपये त्यांना देण्यात आले, तर मागच्या वर्षी म्हणजे 2020-21 या वर्षात 1103.01 टन भाजीपाला पुरवठा केला, तर महामंडळाच्या वतीने 456.31 लाख रुपये त्यांना देण्यात आले. या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांपासून सदर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होतानाच भाजीपाल्याचे सुद्धा उत्पादन वाढत चाललेलं दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com