Tukaram Shet And Tanvi Bambolkar Dainik Gomantak
गोवा

Sahitya Akademi Award: तुकाराम शेट, तन्वी बांबोळकरना साहित्य अकादमी; युवा व बाल साहित्य विभाग

मराठीत आव्‍हाड, विश्‍‍वनाथ यांचा सन्मान; मानपत्र व रोख रक्कम

दैनिक गोमन्तक

साहित्य अकादमीने २०२३ या वर्षासाठीचे युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर केले.‍ कोकणी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार तुकाराम रामा शेट यांच्या ‘जाण’ या कादंबरीला; तर युवा पुरस्कार डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांच्या ‘शॉट’ लघुकथा संग्रहाला मिळाला.

मराठी भाषेत एकनाथ आव्हाड यांना बाल साहित्यासाठी, तर विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्यासाठी गौरवण्‍यात आले.

मानपत्र आणि ५० हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.

बाल साहित्यामध्ये विविध भाषांतील २२ साहित्यिकांच्या पुस्तकांना आणि युवासाहित्यासाठी २० लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार दिला आहे. लवकरच पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून या सोहळ्यामध्ये पुरस्कार दिले जाणार असल्याचे साहित्य अकादमीने स्पष्ट केले आहे.

यंदा काश्मीर भाषा साहित्य पुरस्कार जाहीर केलेला नाही. मणिपूरी भाषेतील साहित्य पुरस्कार लवकर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय साहित्य अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर मला अतीव आनंद झाला. मी त्यामुळे हर्षित झालेच; पण त्याहीपेक्षा आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव झाली.

- डॉ. तन्वी कामत बांबोळकर

गेली ३० वर्षे मुलांसाठी लिहितोय त्याची पोचपावती मिळाली, असे वाटते आहे. काही वर्षांपूर्वी एका लहान मुलाने कविता वाचून मला बरीच वर्षे जपून ठेवलेले मोरपीस दिला. तोच माझ्यासाठी पुरस्कार होता.

- एकनाथ आव्हाड

बालपणात आलेले अनुभव आणि त्‍यावेळचा सर्वांना उभारी देणारा निसर्ग यावर आधारित मी ‘जाण’ ही कादंबरी लिहिली. वाचून लहान मुलांना उत्तम अनुभूती मिळेल, अशी खात्री आहे.

- तुकाराम शेट

गमभन प्रकाशनने माझ्यावर दाखवलेला विश्वास या साऱ्याचे सार्थक झाल्यासारखं वाटतंय. इथून नवं लिखाण करण्याची नवी उमेद मला मिळेल. अकादमी पुरस्कार हे मला परिकथेसारखे वाटतंय.

- विशाखा विश्वनाथ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

SCROLL FOR NEXT