Naibag Highway Accident News Dainik Gomantak
गोवा

Naibag Accident: बापरे! रस्त्यावरील खड्ड्यामुळे निखळला ट्रकचा हौदा! गोव्यातील न्हयबाग-जुना महामार्ग येथील घटना

Naibag Truck Accident News: न्हयबाग येथे जुन्या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रविवारी उत्तररात्री २ वाजता पेपर रोल घेऊन पुण्याला जाणाऱ्या एका ट्रकचा हौदा तुटून रस्त्यावर पडला. सुदैवाने यावेळी मागे दुसरे वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Naibag Old Highway Truck Accident News

पेडणे: न्हयबाग येथे जुन्या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रविवारी उत्तररात्री २ वाजता पेपर रोल घेऊन पुण्याला जाणाऱ्या एका ट्रकचा हौदा तुटून रस्त्यावर पडला. सुदैवाने यावेळी मागे दुसरे वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर माहितीनुसार, एमएच ५०-एन ६४८९ या क्रमांकाचा ट्रक कुंडई येथील औद्योगिक वसाहतीतून पेपर रोल घेऊन पुण्याला जात होता. मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग ८८ वर पडलेली दरड अद्याप हटविण्याचे काम पूर्ण न झाल्याने पूर्वीच्या जुन्या मार्गावरुन वाहतूक वळविण्यात आली आहे. पण या जुन्या महामार्गाला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.

हा ट्रक न्हयबाग येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या उतरणीवर (ढाब्याजवळ) पोचला असता खड्ड्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ट्रकचा हौदा निखळून महामार्गावर पडला. सुदैवाने यावेळी या ट्रकच्या मागे किंवा बाजूने दुसरे वाहन नसल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक आनंद परब यांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT