पेडणे अबकारी खात्याने पत्रादेवी येथे संशयावरून ट्रक थांबवून झडती घेतली असता ट्रकमध्ये विविध बनावटीच्या दारूचे अनेक बॉक्स आढळून आले.या बेकायदा दारूसाठ्याची ट्रकसह 36 लाख रुपये इतकी किंमत होते.
पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील निवडणुकीच्या धर्तीवर गोवा अबकारी खाते सतर्क आहे. पेडणे अबकारी कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी (एमएच ११, बीएल ९८८४) हा मालवाहू ट्रक पत्रादेवी येथे आला असता तो तपासणीसाठी थांबवला.
कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.
या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.
सिमेंट लाद्यांखाली लपवलेले दारूचे बॉक्स
ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.
सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.