Truck Accident in Canacona  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गुळे काणकोण येथे बांबू नेणारा ट्रक कलंडला; एकाचा मृत्यू

ट्रकमध्ये एकूण सात कामगार होते अशी माहिती मिळाली असून त्यातील 5 जणांना किरकोळ जखमा झाल्या.

सुशांत कुंकळयेकर

Goa Accident : बांबू घेऊन जाणारा ट्रक गुळे काणकोण येथे हमरस्त्यावर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उलटला. या ट्रकमध्ये एकूण सात कामगार होते अशी माहिती मिळाली असून त्यातील 5 जणांना किरकोळ जखमा झाल्या. एका गंभीर जखमी झालेल्या कामगाराला बांबूच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. मात्र एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता.

गुळे काणकोण येथे बांबूंनी भरलेला ट्रक कलंडल्याने झालेल्या अपघातात एका 32 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हा कामगार आसाम येथील असून तो बांबूंच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकात चालक व वाहक यांच्यासह एकूण 9 जण होते. त्यापैकी सात कामगार ट्रकच्या हौदात होते. त्यातील 5 किरकोळ जखमी झाले तर एक गंभीर जखमी झाला.

या अपघातामुळे कारवार - गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक बांबू घेऊन काणकोणच्या दिशेने निघाला होता. पडत असलेल्या पावसामुळे ट्रक चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

SCROLL FOR NEXT