Goa Monsoon 2025 Dainik Gomantak
गोवा

Heavy Rain In Goa: गोव्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पडझड; गोवा, कोकणात आकस्मिक पूरजन्य स्थितीची शक्यता

Goa Monsoon 2025: पर्वरी येथे श्रद्धा योग गुरुकुलाच्या कुंपणाजवळील गुलमोहराचा वृक्ष उन्मळून पडला. राज्यात पडझडीच्या घटना सुरूच आहेत

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी (१६ जून) सकाळपासून जोर काहीसा मंदावला असला तरी काही भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, पुढील दोन दिवस ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता असून 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

गोव्यासह कोकण किनारपट्टीवर आकस्मिक पूरजन्य स्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यासह सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, कर्नाटकातील उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड आणि उडपी येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

घरावर कोसळले वडाचे झाड

- वेर्ला-काणका येथे एक मोठे वडाचे झाड घरावर कोसळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरावरील सर्व कौले फुटली सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सत्तरीतील अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. तीन ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले.

- पर्वरी येथे श्रद्धा योग गुरुकुलाच्या कुंपणाजवळील गुलमोहराचा वृक्ष उन्मळून पडला. राज्यात पडझडीच्या घटना सुरूच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT