Plantation Dainik Gomantak
गोवा

श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती निमित्त 'कुडतरी भाजप मंडळा'कडून वृक्षारोपण

राय तळ्यावर केले वृक्षारोपण

दैनिक गोमन्तक

मडगाव: श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त आज कुडतरी भाजप मंडळाकडून कुडतरी येथील प्रसिद्ध राय तळ्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे या परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. असाच कार्यक्रम राय येथील मनोरा मैदानावरही करण्यात आला. ( Tree Plantation from Curtorim BJP Mandal )

हे कार्यक्रम भाजपच्या एसटी मोर्चाचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष अँथनी बार्बोज यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. यावेळी कुडतरी भाजप मंडळाच्या सचिव डॉ. स्नेहा भागवत, अध्यक्ष नीलकंठ एकावडे, ज्येष्ठ स्थानिक नेते सोमनाथ आमोणकर, महिला मोर्चा सचिव बबिता बोरकर, उपाध्यक्ष जयेश नाईक, कुडतरीचे प्रभारी चंदन नायक, व्हिन्सी क्वादृश व अन्य मान्यवर हजर होते.

यावेळी मनोरा मैदानावर आंतोनियो बार्बोज व बेंतो बार्बोज या ज्येष्ठ नागरिकांतर्फे झाडे लावण्यात आली. अँथनी बार्बोज यांनी श्यामाप्रसाद मुखर्जीना श्रद्धांजली वाहतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचे 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

डबल इंजिन भाजप सरकारचा गोमंतकीयांना 'डबल' झटका

मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारचे 100 दिवस साजरे केले त्याच दिवशी भाजप सरकारने गोव्यातील जनतेला घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करून बक्षीस दिले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पंचायत निवडणुकांबाबत सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने भाजप सरकारचा ओबीसीविरोधी अजेंडा उघड झाला आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ आणि ओबीसींना पंचायत निवडणुकांमध्ये आरक्षण न देणे हा “डबल इंजिन” भाजप सरकारने गोव्यातील जनतेला 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल दिलेला “डबल झटका” आहे, असा निशाणा कुंकळ्ळीचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी सरकारवर साधला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT