Special Train 2025 Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कार ऑन ट्रेन! ट्रेनवर कार पार्क करुन आरामात करा मुंबई ते गोवा प्रवास; गणेश उत्सवात सुरु होणार सेवा

Konkan Railway Special Train: खासगी वाहनांना ट्रेनच्या वॅगनवर प्रवेश देण्याबाबत सध्या विचार सुरु असून, येत्या गणपती उत्सवात सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, असेही कोकण प्रशासनाने म्हटले आहे.

Pramod Yadav

मुंबई: कोकण तसेच गोव्यात धावणाऱ्या ट्रेनमधून आता चारचाकी (कार) घेऊन प्रवास करता येणार आहे. ट्रेनमधून ज्या प्रकारे ट्रकची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे आता कारची देखील वाहतूक होणार आहे. विशेष म्हणजे या कारमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोव्या दरम्यान ही सुविधा सुरु करण्याचा मानस कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गणेश उत्सवासाठी कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच, महामंडळाच्या बससेवा आणि ट्रेनला ऐनवेळी बुकिंग मिळत नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी एक पर्याय म्हणून कार ऑन ट्रेन ही सेवा सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वेच्या वतीने केला जात आहे. सध्या केवळ ट्रकच ट्रेनवरुन वाहून नेले जात आहेत. कार वाहतूक सुरु झाल्यास कोकणवासीयांना याचा फायदा होणार आहे.

सध्याचे वॅगन ट्रकच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे काही तात्रिंक बाबींवर काम करण्याची गरज असल्याचे कोकण रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. खासगी वाहनांना ट्रेनच्या वॅगनवर प्रवेश देण्याबाबत सध्या विचार सुरु असून, येत्या गणपती उत्सवात सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, असेही कोकण प्रशासनाने म्हटले आहे.

सध्या अशाप्रकारची सेवा कोलाड आणि मंगळुरु मार्गावर सुरु आहे. कोलाड येथे वाहनांना लोड केले जाते. वाहनातील ड्रायव्हर, क्लिनर (असल्यास) आणि इतरांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. वॅगनवरील सुविधा सध्या फक्त ट्रकसाठी तयार करण्यात आल्याने कारसाठी ती अद्यावत करावी लागणार असल्याने त्याला काही वेळ लागणार आहे. दरम्यान, कोकण मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT