Bus Stand Dainik Gomantak
गोवा

World Calls Bus Stand in Goa: गोव्यातील बसस्थानकांचं रुपडं पालटणार; वाहतूक मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

वास्को कदंब बसस्थानक रस्ता समस्या मार्गी लागणार

दैनिक गोमन्तक

वास्को: गोव्यातील सोळा बसस्थानके जागतिक दर्जाची बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात वास्को, पणजी, मडगाव, म्हापसा या बसस्थानकांचा समावेश असणार आहे. अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे. कदंब बसस्थानक रस्ता डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

(Transport minister mauvin godinho claims goa to have 16 world calls bus stand)

पुढे बोलताना गुदिन्हो म्हणाले, कदंब महामंडळाला आणखी 200 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार आहेत. यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पुरेपूर मदत करीत आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणी जागतिक बसस्थानक पाहण्यास मिळणार आहेत. दाजी व आपण मिळून वास्कोचा विकास करणार आहोत. असे ही ते म्हणाले.

यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर म्हणाले, या रस्त्यामुळे लोकांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री या नात्याने गुदिन्हो यांच्याकडे जेव्हा विकासकामांचा प्रश्न घेऊन गेलो, तेव्हा ती कामे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी हे बसस्थानक जागतिक दर्जाचे बांधण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नागरीकांना आणखी एक दोन वर्षे थोडा त्रास सहन करावा लागेल. या बसस्थानकाचे बांधकाम मार्गी लागेपर्यंत तेथे इतर सुविधा उपलब्ध केल्या जातील. असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास आमदार दाजी साळकर, नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज,उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेविका शमी साळकर, विनोद किनळेकर, गिरिष बोरकर, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात सारमानसवासीय आक्रमक, पुन्हा रोखले ट्रक; एसओपी उल्लंघनाची तक्रार

Ramesh Tawadkar: काहींच्‍या सावलीजवळही उभे राहायची इच्‍छा नाही! तवडकर असं का म्हणाले? राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण

फातोर्ड्यात विरोधकांचं खलबतं! Cash For Job प्रकरणी आता थेट पंतप्रधानांकडे मागणार दाद

Rashi Bhavishya 20 November 2024: आज तुमचा प्रवास घडणार आहे, आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

SCROLL FOR NEXT