Goa Congress on Ration Scam: गरीबांच्या तोंडचा घास सरकारने हिरावला; धान्य घोटाळ्यावरुन काँग्रेस आक्रमक

''निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तपास व्हावा''
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

मडगाव: लोकांसाठी आणलेले स्वस्त धान्य कर्नाटकच्या व्यापाऱ्यांना विकले गेले आहे. यासाठी नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री पाठीशी घालत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. आज काँग्रेस नेत्यांनी पणजी येथे बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

(Congress leader Yuri Alemao has accused Goa government on Ration Scam)

काँग्रेसने म्हटले आहे की, 2020 पासून नागरी पुरवठा खात्याच्या कामाचा पूर्ण लेखाजोखा तपासून पाहावा. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी अथवा या खात्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी, त्यामुळे सत्य बाहेर येईल.

याबाबत बोलताना आलेमाव म्हणाले की, कोरोना महामारी संपली आणि सरकारच्या घोटाळे समोर येऊ लागले. कधी साखर घोटाळा, कधी तूरडाळ घोटाळा आणि आता हा धान्य घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे गरीब लोकांसाठीचा माल सरकार लुटू लागले आहे. असा आरोप ही आलेमाव यांनी यावेळी केला आहे.

या बैठकीत काँग्रेस नेते आलेमाव यांनी गोवा सरकारने राबलेल्या धोरणांचा क्रमवार समाचार घेत लोकांच्या विरोधाचा तरी विचार करा असे ही ठणकावले आहे. यावेळी युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह अनेक काँग्रेस नेते यावेळी हजर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com