Goa Farming: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन मये परिसरातील वायंगण शेतीत पुन्हा एकदा ‘ट्रान्सप्लांटेशन’चा प्रयोग करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पाटो परिसरातील पडीक मिळून चौदा हेक्टर शेतीत ट्रान्सप्लांटेशनद्वारे तरव्याची लागवड करण्यात येणार आहे. रविवारी (ता. 17) या प्रकल्पाचा शुभारंभ करुन काही शेतीत तरव्याची लागवडही करण्यात आली.
कृषी खात्याच्या सहकार्याने कोळवाळ येथील ''मॉडर्न कल्टीव्हेशन टेक्नॉलॉजी''तर्फे हा ट्रान्सप्लांटेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतीची नांगरणीही करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी मये परिसरात वायंगण शेतीत ''ट्रान्सप्लांटेशन''चा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी तो प्रयोग यशस्वीही झाला होता. मात्र पुढे या प्रकल्पाबाबतीत शेतकऱ्यांनी विशेष रस दाखवला नाही. दहा वर्षांनंतर आता पुन्हा हा प्रकल्प अंमलात आणला आहे.
काय आहे ट्रान्सप्लांटेशन?
अशा पद्धतीने लागवड करण्यासाठी मनुष्यबळाची अर्थातच ''कामेरी-मानाय'' यांची गरज भासत नाही. ट्रान्सप्लांटेशनद्वारे तरव्याची लागवड करण्यासाठी कमी वेळ लागतो. त्याचबरोबर खर्चही अधिक होत नाही. ट्रान्सप्लांटेशनद्वारे शेती लागवड केल्यास कृषी खात्याच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानही मिळते.
शेतकऱ्यांसाठी वरदान
नांगरणी करण्यास निर्माण होणारी समस्या आणि अन्य अडचणीमुळे पाटो परिसरातील अर्ध्याहून अधिक शेती पडीक पडीक पडली होती. कृषी खात्याच्या सहकार्याने यंदा ही वायंगण शेती लागवडीखाली आणण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. पर्याय आणि प्रयोग म्हणून ट्रान्सप्लांटेशनद्वारे शेतीत तरव्याची लागवड करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरणार असून, पडीक शेती लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.