Minister Subhash Phaldesai: आव्हाने पेलल्यानंतरच मिळते संधी; मंत्री सुभाष फळदेसाई

Minister Subhash Phaldesai: डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash Phaldesai
Published on
Updated on

Minister Subhash Phaldesai: दलित समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवा पिढीने शिक्षण घेऊन समाजात एकजूट आणण्याची गरज आहे. अधिकार व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती त्यातूनच मिळते. समाजाची धुरा पुढे नेण्यासाठी सक्रिय व्हायला हवे.

Minister Subhash Phaldesai
Cuncolim Industrial Estate: प्रदूषणाविरुद्ध कुंकळ्ळीत ‘कँडल मार्च’

आव्हाने पेलल्यानंतरच संधी उपलब्ध होऊ शकतात. राज्यात आंबेडकर भवन उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे व या सरकारच्या कार्यकाळात ते पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले.

पणजीतील कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम अखिल गोवा दलित महासंघातर्फे आयोजित केला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Minister Subhash Phaldesai
Mhadei River Issue: गोवा भाजपला ‘म्हादई’वरून राजकारण थांबवण्यास सांगा

यावेळी व्यासपीठावर गोवा अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, प्रमुख वक्ते दयानंद म्हेत्तर, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर व इतर उपस्थित होते. यावेळी महासंघाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ सदस्य यांचा मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महासंघातर्फे आयोजित कविता स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्रे व बक्षिसे देण्यात आली.

मंत्री फळदेसाई पुढे म्हणाले की, दलित समाजातील युवा नेतृत्व पुढे यायला हवे. समाजाशी असलेली नाळ यश मिळाल्यानंतरही तोडू नये. कोणत्याही समाजाबाबत द्वेष न करता आपला समाज पुढे नेण्यास धडपड सुरूच ठेवावी. देशात हजारो जाती व धर्म आहेत. मात्र, हे सर्वजण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपापल्या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आंबेडकर भवन लवकरच

राज्यात आंबेडकर भवन होण्याचे दलित समजाचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यापासून त्याचा पाठपुरावा समाजाचे नेते व कार्यकर्ते करत आहेत. हे भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे भवन स्थापन झाल्यानंतर ती इमारत नव्हे, तर मंदिर म्हणून त्याचा वापर करण्यात यावा. त्यातून विद्वतेचे, समाजाचे, संस्कृतीचे, बलस्थान व शक्तीस्थानसाठी प्रेरणा या समाजासाठी मिळेल. या समाजातील लोकांनी व्यवसायावरून त्यांच्यात असलेल्या भिंती मिटवा व एकत्र येऊन या समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन फळदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com