Transfers Dainik Gomantak
गोवा

Sanquelim : साखळी नगराध्यक्षांच्या पत्नीची आल्तिनो-पणजीहून सांगेला बदली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim : म्हादईप्रश्‍नी लढ्याला साथ देणाऱ्या त्याचबरोबर साखळीत सभा आयोजनात सक्रिय सहभाग असलेल्या नगराध्यक्ष राजेश सावळ यांना मुख्याधिकाऱ्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचा तपास अद्याप जैसे थे आहे.

परंतु आता राज्य सरकारने त्याचा राग त्यांच्या पत्नीवर काढला आहे असे दिसते. आल्तिनो येथील मुख्य वास्तुविशारद, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालयातून काम करणाऱ्या सावळ यांच्या पत्नीची तेथून सांगे येथे बदली केली आहे.

आपण म्हादई वाचविण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीला पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यातून माघार घेणार नाही. सरकार हे कृत्य जाणूनबुजून करीत आहे, असे नगराध्यक्ष सावळ यांनी ‘गोमन्तक`ला सांगितले.

जानेवारीच्या 16 तारखेला विर्डी येथील सभेसाठी साखळी पालिकेने पूर्ण पाठिंबा दिला होता. तत्पूर्वी राजेश सावळ यांनी ही सभा नगरपालिकेच्या मैदानावर घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती. परंतु त्यानंतर ही परवानगी मागे घेण्यात आली. साखळीतील नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे.

"मुख्य वास्तूविशारद कार्यालयातून सांगेच्या साबांखाच्या कार्यालयात आपल्या पत्नीची बदली करण्यात आली आहे. आपण स्वतः त्याठिकाणी जाऊन आलो. त्यांच्यासाठी एक टेबल खुर्ची आहे, पण एकही फाईल त्या टेबलावर येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे केवळ मानसिक त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचेच दिसते."

- राजेश सावळ, नगराध्यक्ष, साखळी.

होर्डिंग भाडेपट्टीवरून बाचाबाची

नगराध्यक्ष सावळ व मुख्याधिकारी यांच्यात होर्डिंगच्या भाडेपट्टीतून मिळणाऱ्या महसूलावरून बाचाबाची होऊन हातघाईचे प्रकरण घडले होते. त्यानंतर दोघांनीही पोलिसांतच परस्परविरोधी तक्रारही दिल्या आहेत.

दाखल झालेल्या तक्रारीबाबत पोलिसांनी काय कारवाई केली म्हणून आपण स्वतः पोलिस स्थानकात जाऊन चौकशी करीत आहोत, परंतु त्‍यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सावळ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT