Theft  Dainik Gomantak
गोवा

मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाला 75,000 रुपयांचा गंडा

कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव रेल्वे स्थानकावर चोराने रविवारी रेल्वे प्रवाशाकडील सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर महत्त्वाची कागदपत्रे लांपास केली. चोराने प्रवाशाला एकूण 75000 रुपयांचा गंडा घातला. (Margao Railway Station Goa)

कोकण रेल्वे पोलिसांनी (Police) देलेल्या माहितीनुसार, अंकोला येथील श्याम कसबे (36) यांनी फिर्याद दिली आहे की, मडगाव रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली. यामध्ये 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 15000 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 2000 रुपयांचा समावेश होता. यासोबत पर्समध्ये एटीएम कार्ड, आधार कार्ड (Aadhaar Card), मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी कागदपत्रे देखील होती. पोलिसांनी सांगितले की, श्याम आपल्या कुटुंबासह कारवार ते पनवेल-महाराष्ट्र असा प्रवास करत होता.

कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सुमित सिंगला मोबाईल (Mobile) चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT