कारापूर-सर्वण परिसरात 8 लाखांची तंबाखू जप्त, डिचोली पोलिसांची कारवाई

दुकानातील गोदामात बेकायदेशीरपणे गुटखा आदी वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याचे आढळून आले
Bicholim police action
Bicholim police action Dainik gomantak
Published on
Updated on

डिचोली : डिचोली पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत कारापूर-सर्वण येथे एका दुकानवजा गोदामावर धाड मारून साडेआठ लाख रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

माहितीनुसार कारापूर येथील हिरेमठ जनरल स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी धाड मारली असता, दुकानातील गोदामात बेकायदेशीरपणे गुटखा आदी वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याचे आढळून आले. या तंबाखूजन्य पदार्थांची किमत 8.48 लाख 743 रुपये एवढी असल्याची माहिती मिळाली आहे.

Bicholim police action
धेंपो चॅलेंजर्सला नमवून पणजी जिमखाना मेंबर्स लीग विजयी

डिचोली (Bicholim) पोलिसांनी तंबाखूजन्य जप्त करून, सार्वजनिक आरोग्य कायदा 1985 च्या 87 (एफ) कलमांतर्गत दुकानदारा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस (police) निरीक्षक महेश गडेकर आणि पोलिस उपनिरीक्षक करिष्मा परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com