Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: हृदयद्रावक! काकोडा येथे साळावलीच्या कालव्यात बुडून दोन, 2 वर्षीय बालकांचा मृत्यू

Goa News: दरम्यान, ही घटना कशी घडली? ती मुले त्याठिकाणी कशी व काय करत होती? याची माहिती समोर आलेली नाही.

Pramod Yadav

केपे: शिवनगर-धावडशेत येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोन लहान मुलांचा कालव्यात पडल्याने बुडून करूण अंत झाला.

प्राप्त माहितीनुसार, शिवनगर-धावडशेत येथे काही भाड्याच्या खोल्यांमध्ये भाडेकरू राहात असून त्या खोल्यांच्या शेजारीच शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा पाण्याचा छोटा कालवा आहे. आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन लहान मुले कालव्याच्या दिशेने गेली.

त्या दोघांचाही पाय घसरून ते कालव्यात पडले. ते दोघेही पाण्यातून वाहत साधारण दोन किलोमीटर बेतमोद्दी येथे जाऊन लाकडामध्ये अडकले.

लोकांच्या दृष्टीस लहान मुलांचे मृतदेह दृष्टीस पडल्याने एकच गोंधळ उडाला. नंतर लोकांनी त्वरित याची माहिती कुडचडे पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

रेहान सादिक श्रीट्टी (वय १५ महिने) आणि वाहीद अश्पाक हाश्मी (वय १८ महिने) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत. ही दोन्ही मुले शिवनगर-धावडशेत येथील समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT