Panjim | CCTV Camera Daink Gomantak
गोवा

भावांनो सिग्नल तोडू नका AI च लक्ष आहे! 30 दिवसांत 6,000 जणांनी केले वाहतूक नियमांचे उल्लंघन

1 ते 30 जून या काळात वेगमर्यादा आणि सिग्नल तोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Pramod Yadav

राजधानी पणजी आणि त्याभोवतीच्या परिसरात आर्टीफिशल इन्टेलिजन्स (AI) कॅमेरे बसविण्यात आले आहे. यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवत त्यांना ऑनलाईन पद्धतीने दंड ठोठावला जात आहे. कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच महिन्यात जवळपास 6,000 जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांना दंडात्मक चालान देण्यात आले आहे.

1 ते 30 जून या काळात वेगमर्यादा आणि सिग्नल तोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्टीफिशल इन्टेलिजन्स (AI) कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवण्यास मदत होत आहे. जूनमध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 3,125 जणांना तर सिग्नल तोडणाऱ्या 2,852 जणांना चालान देण्यात आले आहे.

दर दिवसाला एक हजार जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे प्रादेशिक वाहतूक विभागाने म्हटले आहे. कोणत्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केले यावर आधारितच चालान देण्यात आल्याचेही वाहतूक खात्याने म्हटले आहे.

रात्रीच्या वेळेस कोणी नाही असे समजून अनेकजण नियम पाळत नाहीत मात्र, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक नियमांचे पालन सर्वांसाठी गरजेचे असून, उल्लंघन केल्यास कारवाई देखील केली जात आहे.

रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी सिग्नल बंद असतात पण पिवळ्या रंगाचा सिग्नल ब्लिंग करत असतो, अशावेळी सिग्नल तोडल्यास कारवाई केली जात नाही. मात्र, लाल सिग्नल असेल आणि तो तोडल्यास त्यावर कारवाई केली जाते. असे वाहतूक विभागाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT