Traffic Rules Violation in Goa Dainik Gomantak
गोवा

Traffic Rules Violation : 11 दिवसांत 7620 चालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांची मोहीम; 56 लाख रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात वाढणाऱ्या रस्ता अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस विभागाने 14 ते 25 सप्टेंबर या काळात वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेदरम्यान 11दिवसांत 7620 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून सुमारे 56 लाख रुपये दंडात्मक कारवाईतून जमा करण्यात आली. अजूनही वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नाही. या काळात हेल्मेट न वापरल्याप्रकरणी 2.271 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या 11 दिवसांच्या काळात सर्वाधिक कारवाई दुचाकीस्वारांविरुद्ध हेल्मेट न वापरल्याची झाली आहे. या गुन्ह्यासाठी नव्या कायद्यानुसार 100 रुपयांऐवजी 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना किमान तीन महिने निलंबित करण्याचीही तरतूद आहे. हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करूनही हेल्मेट न वापरलेल्या दुचाकी चालकांची संख्या चिंतेचा विषय आहे.

(Traffic Rules Violation in goa)

त्याच्यामागून शहरातील रस्त्यांवर धोकादायक पार्किंग किंवा नो पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्याविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या काळात 3.871 वाहनांना चलन्स (दंड) देण्यात आली आहेत. या गुन्ह्याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 1500 रुपये दंड आहे. रस्त्याच्या वळणावर पिवळ्या रंगाचा पट्टा असूनही त्यावर किंवा झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केली जात आहेत. रस्त्याच्या बाजूने नो पार्किंगचे फलक असूनही तेथे वाहने पार्क करून ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिस मुख्यालयासमोरील आझाद मैदानाच्या चार बाजूने असे प्रकार अधिक दिसून येत आहेत.

वाहतूक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी मद्य घेऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली होती. अनेकदा अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याने पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटर चाचणी सुरू केली होती. त्यानंतर पुन्हा केलेल्या मोहिमेत 101१ जण आढळून आले आहेत. या गुन्ह्यासाठी कैदेची जास्तीत जास्त सहा महिने शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई आहे.

मद्यप्राशन करून वाहने चालवताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करून प्रकरण न्यायालयाकडे पाठवण्यात येते. शिक्षा व दंडाची कारवाई देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. वाहनचालकांनी सीट बेल्ट न लावल्याप्रकरणीची 676 प्रकरणे नोंद झाली आहेत. भरधाव वेगाने वाहने चालविल्याप्रकरणी 701 प्रकरणे नोंद झाली आहेत. अजूनही चालक सीट बेल्ट घालत नाहीत. रस्ता अपघातावेळी हेल्मेट नसल्याने मद्यप्राशन करून वाहन चालवणे तसेच भरधाव वाहन हाकणे ही अपघाताला निमंत्रण देणारी आहेत. त्यामध्ये अनेकांना मृत्यूलाही सामोरे जावे लागले आहे.

पुढील महिन्यापासून गोव्यात पर्यटन मोसम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक येण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे वाहनांचीही संख्या वाढणार आहे. अनेक पर्यटक ‘रेंट ए बाईक’ घेऊन नियमांचे पालन न करता फिरतात. अनेकदा ते ‘नो एन्ट्री’ तसेच ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करून ठेवतात. गोव्यातील वाहनेही धोकादायक पार्किंग किंवा ‘नो पार्किंग’मध्ये उभी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. या वाहनांना व्हिल क्लॅम्प लावून कारवाई केली जात आहे.

1. भरधाव वेग

  • प्रकरणे : 701

  • दंडात्मक रक्कम : 7 .05 लाख

2. हेल्मेट न घालणे

  • प्रकरणे : 2.271

  • दंडात्मक रक्कम : 22.71 लाख

3. मद्यप्राशन

  • प्रकरणे : 101

4. सीट बेल्ट नसणे

  • प्रकरणे : 676

  • दंडात्मक रक्कम : 6.76 लाख

5. धोकादायक व नो पार्किंग

  • प्रकरणे : 3871

  • दंडात्मक रक्कम : 19.44 लाख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT