Goa Crime : बेताळभाटीत आणखी एका बिगरगोमंतकीयाला मारहाण

मुले पळविण्‍याचा संशय; प्रत्यक्षात निघाला निरपराध कामगार
Betalbatim Latest Crime News
Betalbatim Latest Crime NewsDainik Gomantak

मडगाव : मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य गोव्यात फिरत आहेत या अफवेचा लोकांवर एवढा परिणाम झाला आहे की कुणालाही मुले पळविणारा असे समजून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत.

वास्को येथे अशाच गैरसमजातून एका मनोरुग्णाला मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी बेताळभाटी येथे एका निष्पाप बिगरगोमंतकीय मजुराला स्थानिकांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यात या मजुराचे हातपाय बांधून लोक त्याला मारहाण करताना दिसतात. या संबंधी कोलवा पोलिसांनी आज अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Betalbatim Latest Crime News
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मिळालेल्या माहितीनुसार सदर मजूर झारखंड येथील असून त्याचे नाव शानू साहू असे आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका ट्रॉलरवर काम करण्यासाठी गोव्यात आला होता. काल तो गावात फेरफटका मारायला बाहेर पडला असता वाट चुकला. भांबावलेल्या अवस्थेत तो एकाच्‍या परसात घुसला. त्याचवेळी कुणीतरी मुले पळविणाऱ्या टोळीतील हा सदस्य असल्याची हुल उठविल्यावर लोकांनी त्याला यथेच्छ चोपले.

या कामगाराला हिंदी भाषाही धड येत नसल्याने लोकांचा गैरसमज अधिकच वाढला. शेवटी कुणीतरी कोलवा पोलिसांना ही खबर दिल्यावर पोलिस तिथे आले आणि त्याला ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी मोती डोंगरावरही अशाच गैरसमजातून स्थानिकानी एका युवकाला मारहाण केली होती. त्यानंतर वास्को येथे अशी मारहाणीची घटना घडली.

वास्को येथे तिघांना अटक

मुले पळविणारा असे समजून वास्को येथे एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना आज वास्को पोलिसांनी अटक केली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनीया यांनी ही माहिती दिली. याही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवरूनच या तिघांची ओळख पटली.

मडगावात सुरक्षारक्षकाला अटक

एक भिकारी परत परत हाकलूनही जात नाही त्‍यामुळे त्याच्‍यापासून सुटका मिळविण्‍यासाठी त्याला मुले चोरणारा म्हणून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या हॉस्पिसिओ इस्पितळाच्या सुरक्षारक्षकाला फातोर्डा पोलिसांनी खोटी माहिती प्रसारित केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक केली. त्याने मुद्दामहून पोलिसांना खोटी माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com